घरमहाराष्ट्रडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या - आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या – आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी केल्याच्या संशयावरून सीबीआयने मे महिन्यात विक्रम भावेला अटक केली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरयांच्या हत्या प्रकरणी अटक आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ”सीबीआयने केलेल्या तपासात त्रुटी असल्याचा दावा करीत भावेचा जामीन अर्ज मंजूर करावा,”अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावेने इतर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन दिली. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी केल्याच्या संशयावरून सीबीआयने मे महिन्यात त्याला अटक केली होती.

हेही वाचा – कलबुर्गी हत्या – कळसकरसह ६ जणांवर आरोपपत्र दाखल

आरोपीविरोधात सबळ पुरावे नसल्याने जामीन द्यावा – वकील

दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर अटक आरोपी शरद कळसकर याने या गुन्ह्यात विक्रम भावे याचादेखील सहभाग असल्याचे सांगितले, असा दावा सीबीआयने केला आहे. तर याप्रकरणाच्या चौकशीसाठी जेव्हा कधी बोलविण्यात आले तेव्हा भावे यांनी सहकार्य दर्शवले. ते फरार झाले नाही. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्यांना जामीन मिळावा अशी मागणी विक्रम भावेच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीच्या वकीलाची ही मागणी फेटाळून लावत आरोपी विक्रम भावेला जामीन नाकारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -