घरमहाराष्ट्रनागपूर'आम्ही राहुल गांधींचे आभारी, त्यांच्यामुळे...; सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरींचे वक्तव्य

‘आम्ही राहुल गांधींचे आभारी, त्यांच्यामुळे…; सावरकर गौरव यात्रेत नितीन गडकरींचे वक्तव्य

Subscribe

नागपूर : आपल्या स्पष्टवक्तेपणाने नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राहुल गांधींनी वीर सावकरांवर केलेल्या टिप्पणीबाबत बोलताना नितीन गडकरींनी त्यांचे आभार मानले आहेत. गडकरी म्हणाले की, आम्ही राहुल गांधींचे (Rahul Gandhi) आभारी आहोत, त्यांनी आम्हाला वीर सावरकरांना घरोघरी घेऊन जाण्याची संधी दिली.

राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांनी वीर सावरकरांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेने गेल्या महिन्यात वीर सावरकर गौरव यात्रेची (Veer Savarkar Gaurav Yatra) घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी रविवारी (२ एप्रिल) ठाण्यातून या यात्रेला सुरूवात केली. या यात्रेच्या माध्यमातून भाजपा आणि शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. या गौरव यात्रेचे मंगळवारी (4 एप्रिल) नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान केला, पण या अपमानाने सावरकरांची जनमानसात जी प्रतिमा आहे ती कमी झालेला नाही. उलट सावरकरांना घरोघरी नेण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. यासाठी आम्ही राहुल गांधींचे आभारी आहोत. त्यांनी आम्हाला सत्य आणि सावरकरांना घरोघरी पोहोचवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी अपमान करणे सुरू ठेवले पाहिजे, असा टोमनाही गडकरी यांनी राहुल गांधींना लगावला.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांचे सावरकरांबद्दल काय मत होते हे राहुल गांधींनी वाचले वाचले पाहिजे. हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे सावरकरांनीच दाखवून दिले. जातीचे बंधन त्यांनी मोडीत काढले, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

राहुल गांधींनी ‘त्या’ खोलीत राहावे आम्ही एसू लावू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनीही सावरकर गौरव यात्रेदरम्यान राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी म्हणतात मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही. पण तुम्ही ना सावरकर होऊ शकता ना गांधी. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो. अंदमान तुरुंगात सावरकरांना आमच्या टॉयलेटएवढ्या छोट्या अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांना दैनंदिन कामही तिथे करायला लावली जात होती. राहुल गांधी यांनी फक्त एक रात्र त्या खोलीत राहण्याचा प्रयत्न करावा. आम्ही त्यांच्यासाठी एसी लावू, पण ते त्याठिकाणी राहू शकणार नाहीत.

- Advertisement -

गौरव यात्रेला महाराष्ट्रातून सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (२ एप्रिल) महाराष्ट्रातील ठाणे येथून “वीर सावरकर गौरव यात्रेला” सुरुवात केली. राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांनी वीर सावरकरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने गेल्या महिन्यात या यात्रेची घोषणा केली होती. त्याप्रमाणे या यात्रेला सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -