घरताज्या घडामोडीभूमाफिया आमदाराच्या ५०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा - भावना गवळी

भूमाफिया आमदाराच्या ५०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा – भावना गवळी

Subscribe

मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही. माझ्या संस्थेच्या ठिकाणी ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. पण मला व्यक्तीगत कोणतीही नोटीस ईडीने दिलेली नाही. आणीबाणी सारखी वागणूक याठिकाणी दिली जात आहे. सगळ्या शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे. म्हणूनच भूमाफिया असलेल्या भाजप आमदाराचीही भाजपने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे. भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांच्या चौकशीमुळे त्यांनीही भाजपच्या आमदाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. भाजपचे कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या ५०० कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या ईडी चौकशीची मागणी भावना गवळी यांनी केली आहे. (ED at washim : Bhavana Gawali demands bjp mla rajendra patani enquiry for 500 crore land scam)

माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वतः नोंद केला होता. मला हिशोब मिळाला नाही म्हणून हा एफआयआर केला होता. पण त्या एफआयरमधील एकच वाक्य ट्विट करायच आणि एकच आकडा पकडायचा आणि राईचा पर्वत बनवायचा, असा खेळ काही नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून मांडलेला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण भागातील मुले याठिकाणी शिक्षण घेत आहेत. पाच वर्षांपासून मी काम करत आहे. काही लोकांना ते चांगले दिसत नाही. दहा दिवसांपूर्वी मी मागणी केली होती. जे भाजपचे भूमाफिया आमदार आहेत. त्यांचीही ईडी चौकशी लावा अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

राजकारणाची पातळी घसरत आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मी निवडून आलो. माझी काय चौकशी करायची ती करा. माझी चौकशी करत आहात, तशीच आमदाराची चौकशीही करा हीच माझी मागणी आहे. शिवसेनेला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. एफआयआरमध्ये असलेले सात कोटी रूपये कसे दिसतात. त्यासोबतचा मी दिलेला तपशील मात्र कोणीही पाहत नाही. त्याठिकाणच्या आमदाराचीही ईडी चौकशी करा अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, त्यांचीही चौकशी होऊद्या. कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी ५०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला आहे. पाटणे यांच्याविरोधात पुरावे मी दिले होते. पण त्यांची चौकशी मात्र लागली नाही. त्यांचीही चौकशी व्हायला हवी अशीही मागणी त्यांनी केली आहे. ईडीने साधी नोटीसही पाटणी यांनी पाठवली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात मी पाटणींविरोधात तक्रार केली होती. पण तरीही कोणतीही कारवाई झाली नाही.


हे ही वाचा – ईडीची कारवाई ही तर सुरुवात आहे, किरीट सोमय्यांचा भावना गवळींना इशारा

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -