घरमहाराष्ट्रस्थलांतरित मजुरांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची घोषणा

स्थलांतरित मजुरांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची घोषणा

Subscribe

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा झाल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मजुर, कामगारांनी गावचा रस्ता पकडला.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी पुन्हा एकदा आपल्या राज्यात जाण्याचा मार्ग निवडला आहे. दरम्यान कोरोनाचे संकट लक्षात घेता गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्याबाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे.

- Advertisement -

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस- गोरखपूर, उधना- दानापूर, अहमदाबाद-कोलकाता आणि ओखा-गुवाहाटी स्थानकांदरम्यान आणखी चार अतिरिक्त विशेष विशेष, गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या विशेष गाड्यांमुळे मुंबईतील अनेक स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रणात येईल. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी या विशेष लोकल सुरु केल्या तरी प्रवाशांना विनाआरक्षित प्रवास करता येणार नाही. येत्या काही दिवसात उत्तरप्रदेश, बिहार, पाटना, भागलपूर गोरखपूर, गाजीपूर, गुहाटी आणि आसाम राज्यांसाठीही विशेष गाड्या सुरु होणार आहे

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा झाल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मजुर, कामगारांनी गावचा रस्ता पकडला. यामुळे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल, दादर, बोरिवली, वांद्रा अशा अनेक स्थानकांवर काही दिवसांपासून गर्दी पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेमार्फत लांबपल्ल्य़ाच्या गाड्यांची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे विशेष १४ गाड्या लवकरचं सुरु करणार आहे. तसेच उत्सव विशेष गाड्यांच्या ३० फेऱ्या वाढवण्यत आल्या आहेत. जून २०२१ पर्यंत या गाड्या धावणार आहेत. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता गाड्यांना जादा बोगी देखील जोडण्यात येणार आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -