घरमहाराष्ट्रपुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार? रोहित पवारांचा प्रश्न

पुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार? रोहित पवारांचा प्रश्न

Subscribe

अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात सुरू असलेली कुलगुरुंची बैठक देखील उधळवून लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. पण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अश्लील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या गोष्टीचा निषेध करत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, आता या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला. तसेच या आंदोलक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात सुरू असलेली कुलगुरुंची बैठक देखील उधळवून लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. पण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “#रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? #SPPU” असे ट्वीट केले आहे. त्यामुळे या आंदोलक विद्यार्थ्यांवर काही कारवाई करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी एका रॅपरकडून एक गाणे चित्रीत करण्यात आले होते. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर यावरून आक्षेप घेण्यात आला. तर त्या रॅपर विरोधात गुन्ह्याची नोंद करत हा त्याने त्याचे गाणे सोशल मिडीयावरून हटवावे, असे देखील सांगण्यात आले होते. पण या प्रकरणी चौकशी सुरू असतानाच अभाविपच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य हे अत्यंत गंभीर असल्याचे आता बोलले जात आहे. पण या विद्यार्थ्यांवर नेमकी काय कारवाई करण्यात येते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्वतःचं ठेवायचं झाकून आणि…; राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाईंची जीभ घसरली

दरम्यान, विद्यापीठात अश्लील गाण्याचे चित्रीकरण होतेच कसे? तर आम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करत आहे. आम्ही कोणतीही तोडफोड केलेली नाही. अश्लील गाण्याचं चित्रीकरण झालं. त्यावर कारवाई झालेली नाही. कुलगुरू त्याच ठिकाणी बसले आहेत. पण कारवाई करत नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलन पुकारलं आहे, असे आंदोलक विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -