घरमहाराष्ट्रस्वतःचं ठेवायचं झाकून आणि...; राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाईंची जीभ घसरली

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि…; राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाईंची जीभ घसरली

Subscribe

 

मुंबईः स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत, असा दावा खासदार राऊत यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री देसाई यांची खालच्या पातळीवर जाऊन राऊतांना टोला लगावला.

- Advertisement -

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, संजय राऊत अंतरयामी आहेत का?. रोज सकाळी उठायचं आणि तथ्यहिन बोलायचं. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असा प्रकार आहे.

महाविकास आघाडीत आलबेल नाही. कारण २०२४ मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही हे सांगू शकत नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीची स्थापना करणाऱ्या शरद पवार यांनी एवढं मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत संजय राऊत काही बोलत नाहीत. शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे न पटणारे उत्तर राऊत देत आहेत.  त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा राऊत यांचा केविळवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही मंत्री देसाई यांनी लगावला.

- Advertisement -

मंत्री देसाई म्हणाले, बहुमत सिद्ध करण्याची हौस असेल तर त्यांनी तशी मागणी करावी. आम्ही दोनदा १७० चं बहुमत सिद्ध केलं आहे. आता आम्ही १८५ च्या पुढे जाऊ. त्यामुळे राऊत यांनी शिंदेविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करणं याला काहीच अर्थ नाही. तसेच संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर का बोलत आहेत. शरद पवार किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावर बोलायला हवे.

मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि भाजपाला जे हवंय ते साध्य करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं. त्यामुळे त्यांचा वापर करण्यात आला. त्यांचं ते काम पूर्ण झालंय. त्यामुळे भाजपाला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी हे मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत. हे सरकार आल्यापासून भाजपाही रसातळाला जातोय आणि बदनाम होतोय, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री देसाई यांनी खालच्या पातळीवर जाऊन राऊत यांना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -