घरमहाराष्ट्रशिवसेनेला सर्वांत मोठा धक्का कोणता? अमृता फडणवीसांचे ट्विट चर्चेत

शिवसेनेला सर्वांत मोठा धक्का कोणता? अमृता फडणवीसांचे ट्विट चर्चेत

Subscribe

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय काही अंतिम नाही. दरम्यान अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे तर शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट समोर समोर आले आहेत. दरम्यान या सर्व राजकीय संग्रामात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेला एक प्रश्न विचारला आहे सोबत त्याला काही पर्याय सुद्धा दिले आहेत.

अमृता फडणवीस या नेहमीच राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. यावेळी सुद्धा शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठलेल्यानंतर अमृता यांनी ट्विट केले आहे. ट्विट करून त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना ”शिवसेनेला आतापर्यंत बसलेला सर्वांत मोठा धक्का कोणता?” असा प्रश्न त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना विचारला आहे. एसटीही त्यांनी चार पर्यायसुद्धा दिले आहेत.

- Advertisement -

1) धनुष्य आणि बाण चिन्ह गमावणे.

2) 40 आमदार आणि 12 खासदार गमावणे.

- Advertisement -

3) कट्टर उजव्या विचारसरणीचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे.

4) दीर्घकाळ एकनिष्ठ राहीलेला सहकारी भागीदार भाजपची साथ गमावणे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय काही अंतिम नाही. दरम्यान अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्या नंतर ती जागा रिक्त होती. याच रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्धव ठाकरेंचा निर्धार

धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनंतर उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एक फोटोबा शेअर करत जिंकून दाखवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. याला शिवसैनिकांनी सुद्धा उतत प्रतिसाद दिला आहे. पुढील संघर्षांसाठी आम्ही तयार आहोत असंही शिवसैनिकांनी कमेंट करत सांगितले आहे.


हे ही वाचा – अनिल देशमुखांच्या जमीनविरोधात ईडीची सुप्रीम कोर्टात धाव 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -