घरमहाराष्ट्रअधिवेशन गुंडाळणार, मग शाळांना सुट्टी का नाही?

अधिवेशन गुंडाळणार, मग शाळांना सुट्टी का नाही?

Subscribe

राज्यात पसरत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विधीमंडळाचे अधिवेशन शनिवारपासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत कोणताच सरकारकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने शिक्षक, पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून अधिवेशन गुंडाळण्यात येत आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून कोणताच निर्णय घेतला नसल्याबाबत पालक व शिक्षकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.

देशात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली आहे. शाळांमार्फतही जनजागृती करण्याबाबत शिक्षकांना सूचना देण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही काळजी घेण्याबाबत माहिती देण्यात येत आहेत. मात्र आता पुणे व मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण आढळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने स्थगित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला. तीन आठवडे चालणार्‍या अधिवेशनासाठी राज्यातील आमदार मुंबईत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना एकत्रित येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

अधिवेशनात आमदार, सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्रित येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप शिक्षक व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अधिवेशन गुंडाळण्यात येत असताना राज्यातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार तत्परतेने काही पावले उचलणार का?, असा प्रश्न अंधेरतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमधील शिक्षक उदय नरे यांनी उपस्थित केला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून अधिवेशन स्थगित करत आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत असताना सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील शाळा, कॉलेजही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनच्या अ‍ॅड. अनुभा सहाय यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -