घरमहाराष्ट्रनाशिकमाझ्या 'त्या' वक्तव्याने थोरात का निराश झाले? : विखे पाटील

माझ्या ‘त्या’ वक्तव्याने थोरात का निराश झाले? : विखे पाटील

Subscribe

आमदार विखे पाटलांचा पुन्हा एकदा महसूलमंत्र्यांवर निशाणा

शिर्डी – पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे विखे पाटील आणि थोरात यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरू आहे. विखे पाटलांनी नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असुन भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणी ‌किती ‘महसुल’ गोळा ‌केला हे चौकशीत समोर येईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिउत्तर देताना, विखे पाटील सत्तेत नसल्याने त्यांना नैराश्य आले असून त्यातूनच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, त्यांच्या‌ आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हंटले होते.

त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा विखे पाटलांनी थोरातांवर निशाना साधला आहे. बाळासाहेब थोरात निराश का वाटतात हे मला कळत नाही. मी त्यांचे नाव घेतले नव्हते, त्यांनी का मनाला लावून घेतले? हे कळाले नाही. निराश होण्यापेक्षा त्यांनी जाहिरपणे सांगावे की त्यांनी बदल्यांमध्ये पैसे घेतले नाही, स्टँम्प ड्युटीत पैसे घेतले नाही किंवा त्यांचे कोणतेही ‌कार्यकर्ते वाळू धंद्यात नाहीत. मी जे बोललो ते थोरातांच्या मनाला लागलेले दिसते. चौकशी सुरू आहे त्यात समोर येईलच. मला नैराश्य नाही मात्र माझ्या वक्तव्याने थोरात का निराश झाले असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लागवला आहे.

- Advertisement -

पालक मंत्र्यांसह जिल्ह्यातील तीन मंत्री सत्तेत मशगुल

हसन मुश्रीफ नगर जिल्हयाचे पालकमंत्री पद सोडणार का हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले. कोविड काळात त्यांनी काय काम केले हे जनतेने पाहिले. पालकमंत्रीच काय तर इतर तीनही मंत्र्यांचे अस्तित्वच दिसत नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून ते सत्तेत मशगूल आणि धुंद झाले असल्याची टिका करत विखे पाटील यांनी महसूल मंत्री थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -