घरठाणेठाण्यातही चित्रनगरी उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ठाण्यातही चित्रनगरी उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

कलावंतांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहू. ठाण्यातही आता चित्रनगरी उभारणार आहोत, असं ते पुढे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. त्यांनी बंड पुकारले तेव्हा ठाण्यातून त्यांना मोठं बळ मिळालं होतं. आता, कलाकार मंडळीचंही बळ मिळावं याकरता त्यांनी ठाण्यातच चित्रनगरी उभारण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काळात ठाण्याचा आणखी विकास होण्याची शक्यता आहे.

मुंबई – अनेक मराठी मालिकांचे, चित्रपटांचे चित्रिकरण ठाण्यात केलं जातंय. त्यामुळे मुंबईतील चित्रनगरी आता हळूहळू ठाण्याकडे वळतेय. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात ठाण्यातही चित्रनगरी (Film City in Thane) उभारू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ज्येष्ठ नाट्यअभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचे १२५०० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – नाट्यगृहांची स्थिती सुधारा, प्रशांत दामलेंची विनंती मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ मान्य

- Advertisement -

आम्ही तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य केलं. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. रसिक प्रेक्षकांनी दाद दिली तरच कलाकाराची कला वृद्धिंगत होते आणि कलाकाराची मनोबल वाढते. आमचंही तसंच आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. उशिरापर्यंत ते काम करायचे. गर्दी जमायची. कामं तत्काळ केली जायची. करतो, बघतो, ठेवतो असे शब्द आमच्या शब्दकोशात नाहीत. काम होणार असेल तर आम्ही करतो. नसेल तर नाही सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते…पोस्ट शेअर करत सचिनने केलं प्रशांत दामलेंचे कौतुक

- Advertisement -

कलावंतांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहू. ठाण्यातही आता चित्रनगरी उभारणार आहोत, असं ते पुढे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. त्यांनी बंड पुकारले तेव्हा ठाण्यातून त्यांना मोठं बळ मिळालं होतं. आता, कलाकार मंडळीचंही बळ मिळावं याकरता त्यांनी ठाण्यातच चित्रनगरी उभारण्याची योजना आखली आहे. त्यामुळे येत्या काळात ठाण्याचा आणखी विकास होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे मोठी चित्रनगरी आहे. मराठी, हिंदी मालिकांसह बॉलिवड चित्रपटांचंही येथे चित्रिकरण होतं. त्यानंतर, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी रायगड येथे भव्य चित्रनगरी उभारली आहे. या चित्रनगरीलाही भव्य प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, आता ठाण्यातही चित्रनगरी उभी राहणार आहे. त्यामुळे निर्मात्यांचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -