घरक्रीडासचिनच्या कटआऊटवर काळं तेल ओतल्याने देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले... 

सचिनच्या कटआऊटवर काळं तेल ओतल्याने देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले… 

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

भारताचा महान फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दर्शवणारे ट्विट केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच भारतासाठीचे निर्णय घेतले पाहिजेत. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया’, असे ट्विट सचिनने केले होते. सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवणारे ट्विट केल्यामुळे सचिनवर सध्या बरीच टीका होता. त्यातच केरळमध्ये भारत युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या कटआऊटला काळ्या तेलाची आंघोळ घातली. मात्र, हा प्रकार पाहून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले.

सचिनने केलेल्या ट्विटला विरोध दर्शवण्यासाठी केरळमध्ये भारत युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कटआऊटला काळ्या तेलाची आंघोळ घातली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. ‘केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?’ असा प्रश्न फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – सचिन ‘इतर’ गोष्टींबाबत बोलताना काळजी घे – शरद पवार


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -