घरनवी मुंबईमहाविकास आघाडीच्या विरोधात १० राजकीय पक्षांनी कसली कंबर

महाविकास आघाडीच्या विरोधात १० राजकीय पक्षांनी कसली कंबर

Subscribe

महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

नवी मुंबईत महानगरपालिका निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी काळात कधीही निवडणुकांची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. परंतु महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यसाठी आपली कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी विरोधात १० राजकीय पक्ष एकत्र येत नवी मुंबई विकास आघाडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवी मुंबई विकास आघाडी निवडणुक लढवणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपा आणि नवी मुंबई विकास आघाडी अशी त्री सुत्री लढत पाहायला मिळणार आहे. या त्री सुत्रीमुळे निवडणुकीचो वारे जोराने वाहताना दिसण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत सध्या भाजप-आरपीआय आठवलेंची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता पालट करण्य़ासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून तसेच भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना धुळ चारण्यासाठी जय्यत तयारी सुरु करत आहेत.

- Advertisement -

नवी मुंबई विकास आघाडी 

नवी मुंबईत वर्षानुवर्षे काम करणारे पक्ष म्हणजेच रिपब्लिकन सेना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी लालबावटा, घर हक्क संघर्ष समिती, सोशलिस्ट पार्टी, आरपीआय आर.के.गट जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र जनशक्ती सेना,सीपीएम या पक्षांनी एकत्र येत नवी मुंबई विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत या सर्व सेक्युलर पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बेलापूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यलयात पाड पडली होती. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला होता. महाविकास आघाडीच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडी निवडणूक लढवणार आहे.

महानगरपालिका निवडणूकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत महाविकास आघाडी विरुद्ध नवी मुंबई विकास आघाडी अशी पाहायला मिळणार आहे. नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने १११ जागा लढवण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई विकास आघाडीचे १० फेब्रुवारी २०२१ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -