घरठाणेWinter Session : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरून संजय केळकरांची लक्षवेधी; म्हणाले, "निर्ढावलेले अधिकारी..."

Winter Session : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरून संजय केळकरांची लक्षवेधी; म्हणाले, “निर्ढावलेले अधिकारी…”

Subscribe

अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक बळी जाऊनही महापालिकेला जाग येत नसल्याची चीड येते, असा संताप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

ठाणे : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज नववा दिवस आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाण्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात लक्षवेधी मांडली. ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात. पण निर्ढावलेले अधिकारी फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक जीव गेले आहेत. मग महानगरपालिकेच्या जाग का येत नाही? असा सवाल संजय केळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केला आहे.

संजय केळकर म्हणाले, “ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. शहरात कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, माजिवडे, मानपाडा, येऊर आदी भागात अनधिकृत इमारतींची बांधकामे झाली असून काही सुरू देखील आहेत. याबाबत ठामपा आयुक्तांना भेटून छायाचित्रानिशी पुरावे सादर केले आहेत. ते कारवाईचे आदेश देतातही, पण खालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटिसा बजावतात आणि त्यांना पाठिशी घालतात. अनधिकृत बांधकामे कोसळून शेकडो नागरीकांचे नाहक बळी जाऊनही महापालिकेला जाग येत नसल्याची चीड येते, असे त्यांनी सभागृहात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा…; अजित पवारांची सभागृहात माहिती

ठाण्यात अनधिकृत बांधकामे उभारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रती चौरस फुटाने पैसे घेतले जातात. याबाबत अधिकाऱ्यांवरही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे कारवाई व्हायची नसेल तर ठाण्यात यावे, अशी भावना अधिकाऱ्यांची झाली आहे, अशी टीका केळकर यांनी प्रशासनावर केली. नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असताना आणि दुर्घटनांची टांगती तलवार डोक्यावर असताना शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ठोस योजना आखणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत इमारतींमध्ये नागरिक राहण्यास आल्यावर त्यावर कारवाई करता येत नाही. मग अशा इमारतींना वीज, पाणी आदी सुविधा न देण्याबाबतचे धोरण आखणार आहात की नाही, असा प्रश्नही संजय केळकर यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – मल्लिकार्जुन खर्गेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा, ममता बॅनर्जींचा INDIA आघाडी बैठकीत प्रस्ताव

सामंतांचा उत्तरावर केळकर म्हणाले…

एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू असल्याचे सांगितले. अनधिकृत बांधकामांबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात उत्तर दिले. उदय सामंताच्या उत्तरावर संजय केळकर म्हणाले, “अधिवेशनात लक्ष्यवेधीवर बोलताना सोबत अनधिकृत बांधकामांच्या पुराव्याची फाईलच आणली होती. मात्र मंत्री उदय सामंत यांनी फक्त माजिवडा येथील दोनशे चौ.फुटाच्या बांधकामाला आणि बाळकूम येथील बांधकामाला एमआरटीपीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे उत्तर दिले. यावर संताप व्यक्त करत आमदार केळकर यांनी मंत्र्यांचे उत्तर दिशाभूल करणारे आहे, असे सांगितले. शहरात लाखो एफएसआयची चोरी होते, लाखो चौरस फुटांवर अनधिकृत बांधकामे होत असताना मंत्री फक्त 200 चौ.फुटाच्या बांधकामावर कारवाई केल्याचे सांगतात हे हास्यास्पद असल्याचेकेळकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -