घरमहाराष्ट्रनाशिकएअर इंडियाची नाशिक-दिल्ली सेवा

एअर इंडियाची नाशिक-दिल्ली सेवा

Subscribe

सप्टेंबरपासून सेवा प्रस्तावित

जेट कंपनी आर्थिक गर्ततेत सापडल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेज कंपनीचे टाईम स्लॉट एअर इंडीया कंपनीला देण्यात आल्याने कंपनीने साधारणपणे १५ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ही सेवा दिली जाणार आहे.

एक वर्षापूर्वी म्हणजेच १५ जून २०१८ रोजी जेट एअरवेजने नाशिक-दिल्ली सेवेचा शुभारंभ केला होता. या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रवासी आणि कार्गो या दोन्हीची वाहतूक या सेवेद्वारे होत होती. मात्र, जेट एअरवेज कंपनी आर्थिक गर्तेत अडकली. त्यामुळे एप्रिल महिन्यात जेट एअरवेजची सर्व उड्डाणे बंद करण्यात आली. याचा फटका नाशिक-दिल्ली सेवेलाही बसला. दरम्यानच्या काळात जेट एअरवेजचे महत्त्वाच्या शहरांना जोडणारे स्लॉट अन्य कंपन्यांना देऊ नये, अशी भूमिका स्विकारली. परंतु जेटच्या खरेदीसाठी अद्याप कोणत्याही कंपनीने स्वारस्य न दाखवल्याने आता हे स्लॉटही अन्य कंपनीकडे देण्यात आले आहेत. या नाशिक-दिल्ली सेवेचाही समावेश आहे. हे स्लॉट घेण्यासाठी एअर इंडिया, अलायन्स एअर, विस्तारा, एअर एशिया, गो एअर, इंडिगो, स्पाईसजेट या कंपन्यांना तयारी दर्शवली होती. एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. त्यामुळे दिल्ली सेवेला मिळणारया प्रतिसादाची दखल अलायन्स एअरने घेतली. त्यानुसार कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून जेट एअरवेजच्या स्लॉटची मागणी केली. आता ओझर विमानतळाहून नाईट लॅण्डिंगचीही सेवा उपलब्ध झाल्याने एअर इंडीयाने नाशिक दिल्ली सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या हज यात्रा सुरू असल्याने कंपनीचे एअरक्राफट या यात्रेसाठी राखीव आहे त्यामुळे साधारणपणे १५ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. याकरीता आवश्यक सर्व सेवा सुविधा ओझर विमानतळावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच नाशिककरांना दिल्लीसाठी सेवा उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

अशी असेल वेळ

सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस सेवा असेल. नवी दिल्लीहून दुपारी १२.०५ला विमान निघेल आणि ते नाशिकला दुपारी २.१०ला पोहचेल. त्यानंतर नाशिकहून दुपारी २.४५ वाजता विमान निघेल आणि ते सायंकाळी ४.३५ वाजता पोहोचेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -