घरमहाराष्ट्रसप्तशृंगीगडावरील दरीत आढळला महिलेसह बालकाचा मृतदेह

सप्तशृंगीगडावरील दरीत आढळला महिलेसह बालकाचा मृतदेह

Subscribe

सप्तशृंगीगडाच्या खोल दरीत अनोळखी महिला आणि दहा ते अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

सप्तशृंगीगडाच्या खोल दरीत अनोळखी महिला आणि दहा ते अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. काल, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका व्यक्तीला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर कळवण आणि सप्तशृंगीगड पोलील तसेच पोलीस मित्रांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दरीतून बाहेर काढण्यात आले. यातील महिलेचे वय अंदाजे ४० वर्ष असून मुलाचे दहा ते अकरा वर्ष असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्ही मृतदेह कळवण उपजिल्हा आणण्यात आले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अंधार पडल्यामुळे पहाटे काढले मृतदेह बाहेर

यासंदर्भातील सविस्तर माहितीनूसार, सप्तशृंगी गडावर शिवालयलगत असलेल्या सतीचा कडा येथे एका भाविकाला काल दुपारी ४ च्या सुमारास खोल दरीत खाली महिला आणि लहान मुलांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याबाबत पोलीस आणि पोलीस मित्रांना माहिती देण्यात आली. परंतु, अंधार झाल्याने मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. अखेर आज सकाळी मोहीम हाती घेत ग्रामस्थांच्या मदतीने एक हजार फुट खोल दरीत अर्ध्या दरीतच अडकलेला महिलेचा आणि मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

- Advertisement -

ग्रामस्थांचीही मिळाली मदत 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आय. खाडे, पी. एन. गवळी, पी. सी. शिंदे, एस. सी. आहिरे, पी. सी. घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र आणि ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -