घरमहाराष्ट्रमहिला दिन विशेष: पिंपरीत अमृततुल्य हॉटेलमध्ये महिलांसाठी मोफत चहा

महिला दिन विशेष: पिंपरीत अमृततुल्य हॉटेलमध्ये महिलांसाठी मोफत चहा

Subscribe

महिला दिनाचे विशेष म्हणून चहाचे सहा प्रकार ठेवले असून यात साधा चहा, मसाला चहा, लेमन टी, ग्रीन टी आणि लहान मुलींसाठी हॉट चॉकलेट चहा ठेवला होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज महिला दिनानिमित्त एका हॉटेलमध्ये ४०० महिलांना मोफत चहाचा आस्वाद घेता आला. पिंपरी-चिंचवड शहराच्या रावेत येथे दोन उच्च शिक्षित तरुणांनी सुरु केलेल्या हॉटेलमध्ये आज अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी लहान मुलीपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांन मोफत चहा ठेवला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४०० पेक्षा जास्त महिलांनी याचा आस्वाद घेतला आहे. पिंपरीच्या रत्ना अमृतुल्यमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. या हॉटेलचे मालक संकेत चौगुले आणि अक्षय राऊत हे दोघेही उच्चशिक्षित आहेत.

मोफत चहाचा उपक्रम

रावेत येथे अक्षय आणि संकेत यांनी चहाचे हॉटेल थाटले असून दोघे ही उच्च शिक्षित आहेत. समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी खास मोफत चहा ठेवला होता. यात कामगार महिला, महाविद्यालयीन तरुणी, गृहिणी आणि संगणक अभियंता तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल ४०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक महिला आणि मुलींना मोफत चहा देणार असल्याचे फ्लेक्सद्वारे कळवले होते. तसे शहरातील अनेक भागात चहा मोफत देणार असल्याचे त्यांनी फ्लेक्स लावले होते.

- Advertisement -

महिलांसाठी विशेष म्हणून चहाचे सहा प्रकार

विशेष म्हणजे चहाचे सहा प्रकार ठेवले असून यात साधा चहा, मसाला चहा, लेमन टी, ग्रीन टी आणि लहान मुलींसाठी हॉट चॉकलेट चहा ठेवला होता. याचा आस्वाद अनेक महिलांनी घेतला आहे. या उपक्रमाने महिला वर्ग भारावून गेला आहे. एरवी एक रुपया न सोडणारे चहावाले आज चक्क मोफत चहा दिल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. रत्ना अमृतुल्य हे रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे संकेत आणि अक्षय यांनी सांगितले असून मोफत चहाचा अधिक महिलांनी आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -