घरमहाराष्ट्रकोस्टल रोडसाठी वरळी सीफेसवर हातोडा

कोस्टल रोडसाठी वरळी सीफेसवर हातोडा

Subscribe

कोस्टल रोडसाठी वरळी सी - फेसला लागून असणारा ८३ वर्षाच्या पादचारी मार्गावर महापालिकेचा हातोडा पडणार आहे.

मुंबईतील वरळी सी – फेसला लागून असणाऱ्या फुटपाथवर महापालिकेचा हातोडा पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोस्टल रोडसाठी वरळी सी – फेसला लागून असणाऱ्या ८३ वर्ष जुन्या पादचारी मार्गावर महापालिकेकडून मार्ग तोडण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणाऱ्या कोस्टल महामार्गासाठी हा पादचारी मार्ग तोडण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. मात्र हा मार्ग तोडण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

यासाठी तोडणार ८३ वर्ष जुना पादचारी मार्ग

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी बीएमसीने अनेक रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्यासाठीच उत्तर मुंबई दक्षिण मुंबईशी जोडण्यासाठी कोस्टल रोडचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प वरळी सीलिंकलाही मुख्य रस्त्याशी जोडणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी इंग्रजांनी उभ्या केलेल्या ८३ वर्ष अशा जुन्या वरळी सीफेसच्या पादचारी मार्गावर महापालिकेकडून हातोडा मारण्यात येणार आहे.

- Advertisement -

२ किमी लांबीचा पादचारी मार्ग

वरळी सीफेसच्या पादचारी मार्ग हा दोन किमी लांबीचा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक रहिवाशी सकाळ, सायंकाळ आणि रात्री फेऱ्या माराण्यासाठी येत असतात. मुंबईत फिरण्याचे असे मार्ग आधीच कमी झाले आहेत आणि आता हा देखील पादचारी मार्ग तोडण्यात येत असल्याचे समजताच येथील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे.

पादचारी मार्गाच स्वरुप त्याला नाही

कोस्टल महामार्गाकरता २ किमी लांबीचा पादचारी मार्ग महापालिकेने तोडण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील त्याठिकणी चार किमी लांबीचा कोस्टल रोड खालून जाणार असून अनेक बोगद्यांनी युक्त असणार आहे. पण या पादचारी मार्गाचं स्वरुप त्याला कधीच मिळणार नसल्याचे बोले जात आहे.

- Advertisement -

नवीन पादचारी मार्ग ७०० मीटर दूर

या पादचारी मार्गापर्यंत लोकांना सहज जाता येणार असून हा नवीन पादचारी मार्ग ७०० मीटर दूर असणार आहे. तसेच त्यावर अनेक बोगदे असतील. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे मत केशव शेणॉय यांनी व्यक्त केल आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेता महापालिका कोस्ट रोड प्रकल्पात काही बदल करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


वाचा – कोस्टल रोडवरून वरळी कोळीवाड्यात संताप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -