घरमहाराष्ट्रतक्रार अर्ज खोटा अन् पतीचे नावही खोटे, शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपामध्ये संजय...

तक्रार अर्ज खोटा अन् पतीचे नावही खोटे, शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपामध्ये संजय राठोड यांना क्लीनचीट

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना महिलेने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीच्या आरोपाप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. एका महिलेनं शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. पण, पोलीस तपासातून या प्रकरणी कोणतेही तथ्य समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे.

संजय राठोड यांच्यावर एका महिलेने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड केला होता. या संदर्भातील तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात पोस्टाने पाठवली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर संजय राठोड यांची १४ तारखेला जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी पूर्ण केली, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी याबद्दल माहिती दिली.

- Advertisement -

पोलिसांनी काय सांगितलं?

विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला असून अर्जावरील सही त्या महिलेची नाही. तसंच, महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा आणि महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असं यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितलं आहे.

 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -