घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रब्लॉकचेन आधारित प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

ब्लॉकचेन आधारित प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

Subscribe

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आज २९ वा दीक्षांत समारंभ होत आहे. यंदापासून प्रथमच विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन आधारित पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र अधिक सुरक्षित असून, या प्रमाणपत्राची वैधता ऑनलाईन काही क्षणात तपासता येणार आहे. ब्लॉकचेनमुळे बनावट प्रमाणपत्राला आळा बसेल, अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली. पदवी समारंभाच्या पार्श्वभूमीवर आपलं महानगरने प्रा. सोनवणेंशी साधलेला संवाद..

मुक्त विद्यापीठाच्या २९ व्या पदवी प्रमाणपत्र समारंभाचे वेगळेपण काय आहे?

- Advertisement -

– प्रमाणपत्राची वैधता, तंत्रज्ञानाने प्रमाणपत्राची सहज उपलब्धता, बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या २९ व्या पदवी समारंभाचे वैशिष्ठ्य आहे. (YCMOU Open University convocation ceremony nashik news)

ब्लॉकचेन आधारित प्रमाणपत्राबद्दल काय सांगाल?

- Advertisement -

– बोगस प्रमाणपत्रप्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पदवी प्रमाणपत्र चांगल्या दर्जाचे व सुरक्षित असले पाहिजे, यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पदवी प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञामुळे प्रमाणपत्र हॅक करून त्यामध्ये बदल करता येणार नाही. मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरक्षित पदवी प्रमाणपत्राची व्यवस्था केली आहे. तसेच, ब्लॉकचेनचा वापर करणारे मुक्त विद्यापीठ देशातातील पहिले विद्यापीठ आहे. ब्लॉकचेन वापर २९ व्या पदवी प्रदान समारंभापासून केला जाणार आहे.

क्यूआर कोडबाबत काय सांगाल?
– पदवी प्रमाणावर क्यूआर कोड देण्यात आला आहे. एखाद्या विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड झाल्यानंतर पदवीची वैधता तपासणीसाठी संबंधित कंपनी किंवा संस्था पारंपारिक पद्धतीनुसार प्रमाणपत्र झेरॉक्स व ईमेल घेत विद्यापीठाकडे चौकशी करायची. त्यासाठी ठराविक कालावधी जायचा. बदलत्या काळानुरुप प्रमाणपत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. आता क्यूआरव्दारे प्रमाणपत्र पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना क्यूआर कोडची लिंक घेताना मुक्त विद्यापीठाचे शुल्क अदा केल्यानंतर डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी किंवा शैक्षणिक कामासाठी प्रमाणपत्राची मुळ प्रत बाळगण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामकाजात भविष्यात अडचणी येणार नाहीत.

प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करायचे?
२९ वा पदवी प्रदान समारंभा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. रजिस्टर क्रमांक आणि जन्मतारीख देताच अ‍ॅपव्दारे प्रमाणपत्र दिसेल. बुधवारी दुपारी १ ते २ वाजता अ‍ॅपचे काम पूर्ण होईल. त्यानंतर विद्यापीठाच्या एक लाख ५५ हजार ६०७ विद्यार्थ्यांना एकाचवेळी पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल.

प्रमाणपत्रावरील गोल्डन लोगोबाबत काय सांगाल?
– यंदा प्रथम मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणार्‍या पदवी प्रमाणावर गोल्डन लोगो असणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र अधिकाधिक आकर्षक असेल.

आगामी अभ्यासक्रमांबद्दल काय सांगाल?
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कामाचा प्रदीघ अनुभव असून, त्याचा उपयोग मुक्त विद्यापीठात काम करताना होत आहे. मुक्त विद्यापीठातर्फे पुढील शैक्षणिक वर्षापासून रोजगाराभिमुख कौशल्य आधारित नवीन अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहे. नवीन अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्या वाढवून महसूल वाढविला जाणार आहे. मुक्त विद्यापीठातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओपन कॉलेज सुरु केले जाणार आहेत. आगामी दोन वर्षांमध्ये शैक्षणिक शुल्कात वाढ केली जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -