कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’, परतीच्या पावसाने शेतीचेही नुकसान

परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्याला सुद्धा झोडपून काढले. सोयाबीन, ऊस आणि खरीप पिकांचं या परतीच्या पावसात मोठं नुकसान झालं. यासोबतच टोमॅटो आणि द्राक्ष बागांचे सुद्धा नुकसान झाले.

राज्यभरात (maharashtra monsoon update) परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुंबई (mumbai) ठाण्यासह सांगली, अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर (kolhapur) , धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान आजही हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

परतीच्या पावसाने राज्यभरात चांगलाच जोर धरला आहे. या परतीच्या पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना मोठया प्रमाणावर फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस नई भाजीपाल्याचा समावेश आहे. यासोबतच द्राक्ष बागांनासुद्धा या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. आजही राजच्या काही भागात पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

सांगलीमध्ये द्राक्ष बागांना परतीच्या पावसाचा फटका

परतीच्या पावसाने सांगली जिल्ह्याला सुद्धा झोडपून काढले. सोयाबीन, ऊस आणि खरीप पिकांचं या परतीच्या पावसात मोठं नुकसान झालं. यासोबतच टोमॅटो आणि द्राक्ष बागांचे सुद्धा नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी सोयाबीन काढून शेतात ठेवले आहेत आणि अशातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने हातात आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

कोल्हापूरला सुद्धा परतीच्या पावसाने झोडपले

कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तिथल्या वाहतुकीवर या पावसाचा परिणाम झाला. कोल्हापूर जिल्याला हवामान खात्याने 13 ऑक्टोबर पर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोल्हापुरात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन आणि भात पिकांच्या कापणीला वेग आला आहे. दुसरीकडे शेतातील भात पीकाचे सुद्धा नुकसान झाले. कोल्हापुरात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. भात, सोयाबीन आणि भूईमुग या पिकांच नुकसान मोठं नुकसान झालं आहे.