घरमहाराष्ट्र...तरीही खरी शिवसेना आम्हीच; निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही दीपक केसरकर ठाम

…तरीही खरी शिवसेना आम्हीच; निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही दीपक केसरकर ठाम

Subscribe

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवलं आहे. अंधेरी पोट निवडणुकीसाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाहीय. त्यामुळे दोन्ही गटात मोठी खळबळ माजली आहे. मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. यादरम्यान, निवडणूक आयोगाने कोणताही निकाल दिला असला तरीही आम्हीच खरी शिवसेना असल्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ठाम आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना नावाच्याही वापरावर बंदी

- Advertisement -

निवडणूक आयोगाचा निकाल समोर आल्यानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा पुनुरुच्चार केला. तसंच, पक्षचिन्ह गोठवलं असलं तरी आमचा धनुष्यबाणावरच दावा असणार आहे असं दीपक केसरकर म्हणाले.

एखाद्या आमदाराला अडीच लाख लोक मदतान करत असतात. तर, खासदाराला २५ लाख लोक मतदान करत असतात. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आणि खासदार आहेत. पदाधिकारीही आमच्याकडेच आहेत. जास्तीत जास्त लोकांचा कोणाला पाठिंबा यावर लोकप्रतिनिधी ठरत असतात. दसरा मेळाव्याला बीकेसीचं ग्राऊंड भरलं आणि आजूबाजूलाही गर्दी होती. शिवाजी पार्कपेक्षा तीनपट बीकेसी ग्राऊंड मोठं आहे. याचा अर्थ ७० टक्के शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – नवं नाव आणि चिन्ह कोणतं? एकनाथ शिंदेंनी उद्या बोलवली तातडीची बैठक

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या सर्व मंत्र्यांच्या बैठका आणि दौरा रद्द करण्यात आल्या असून सर्वांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -