घरमहाराष्ट्रतुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

मुंबई – माजी मंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शनही केलं. यावेळी तुम्ही ठाण्यात सभा लावा मी आलोच म्हणून समजा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पोहरा देवीला मेळावा घ्यायचं जाहीर केलं आहे. आता मी ठाण्यात पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा. कोणतंही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहाणं योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले. ‘काहीजण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही त्यांना. का करू विनंती? तुम्ही आम्हाला संपवायला निघाला. तुम्ही आडवे गेला नसता तर दसरा मेळावा सोपा झाला असता. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असेल तर मी अजून चिडून कामाला लागतो, असा सूचक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

‘कोणी विनंती करतंय काय हे बघत होते. मग कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली. म्हणजे विनंती करण्यासाठी विनंती केली गेली. तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं, असं त्यांना वाटलं. मग माझं नाव आणि चिन्ह गोठवण्याची घाई का केली?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीवरून विचारला.

‘उद्धव ठाकरे पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत. मोठी सभा साहेब तिथे घेतील. दिवाळी झाल्यावर साहेब सभा घेतील. ही सभा ऐतिहासिक होणार आहे. उद्धवजी ठाकरे यांची श्रद्धा तिथे आहे. येत्या काळात शिवसैनिक कायम उद्धव साहेबांसोबत राहणार आहे,’ असा विश्वास संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -