घर महाराष्ट्र ७ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपीने घेतला गळफास

७ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, आरोपीने घेतला गळफास

Subscribe

नराधमाने चिमुकलीवर बलात्कार करत तिची हत्या केली आणि नंतर स्वत:ला देखील संपवून घेतले. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अजूनच वाढले आहे.

पिंपरी- चिंचवडमधील दापोडी येथील सेमीई गेट परिसरात सात वर्षांच्या मुलीवर विजय बहादूर यादव या ओळखीच्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर नराधमाने मुलीची हत्या केली आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडित मुलीची आई ही कामावर गेली होती, तर बहीण शाळेत गेली होती. ही वेळ साधून नराधमाने त्या चिमुकलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिची हत्या केली आणि स्वत:ला देखील संपवून घेतले. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अजूनच वाढले आहे. तपासादरम्यान, संशयित आरोपीच्या खिशात निरोध सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवघ्या ७ वर्षांची पीडित तिच्या आई आणि बहिणीसह दापोडी सेमीइ गेट येथे राहत होती. मंगळवारी सकाळी पीडित मुलीची आई कामावर आणि बहीण शाळेत गेली होती. पीडित मुलगी घरी एकटीच आहे हे पाहून, तो तरूण घरात घुसला आणि त्याने त्या चिमुरडीवर बलात्कार करत तिची हत्या केली. विजय यादव असे या आरोपीचे नाव असून, सुरुवातीला त्याने त्याच घरातील खिडकीला गळफास लावून आत्महत्या घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न फसला.


वाचा: धक्कादायक! बापाने पोरीसोबत असे काही केले की…

यामुळे घाबरलेला विजय पीडितेच्या घरातून पळाला आणि जवळच्या झाडीत जाऊन गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी पावणे आकराच्या सुमारास आई कामावरून आल्यानंतर मुलगी बेडच्या खाली निपचित पडल्याचे निदर्शनास आले. तिने मुलीला घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय गाठले. तिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. मयत मुलीची आई आणि संशयित आरोपी हे एका खानावळीत काम करायचे. रात्री दोघांचे भांडण झाले होते. ‘तुला उद्या बघून घेईन’, अशी धमकी त्याने मुलीच्या आईला दिली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. संशयित आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशमधील होता. तर मुलीची आई गेल्या सहा महिन्यांपासून खानावळीत भांडी धुण्याचं काम करत आहे.

मयत मुलीच्या आईचे आणि आरोपीचे घरचे संबंध होते. आरोपीने लग्न करण्यास तगादा लावत होता. मात्र, मयत मुलीची आई लग्न करण्यास तयार नव्हती. यावरून त्यांच्यात सोमवारी रात्री भांडण झाले, तेव्हा ‘तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर  मी असं काही तरी करेन की तुला आयुष्यभर अद्दल घडेल’ अशी धमकी आरोपीने दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याने आज घरात कोणी नसताना ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -