घरमहाराष्ट्रनाशिकसैल, सुती कपड्यांना तरुणाईची पसंती; २० ते २५ टक्क्यांनी वाढली मागणी

सैल, सुती कपड्यांना तरुणाईची पसंती; २० ते २५ टक्क्यांनी वाढली मागणी

Subscribe

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध ऑफर्स

नाशिक : उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने, उकाडा कमी करण्यासाठी नागरिकांकडून शीतपेयांसह सुती कपड्यांना पसंती दिली जाते आहे. विशेषतः हलक्या फिकट रंगाचे प्लेन टी-शर्टसह फुलांची डिझाईन, लँडस्केप, निओ क्लासिकल, बोटॅनिकल, लाईन्स अशा प्रिंट पॅटर्नला तरुणाईची विशेष पसंती लाभते आहे.

उन्हाळ्यासाठी खास क्वामरिन, स्कूबा ब्ल्यू, स्ट्रॉबेरी आईस, कस्टर्ड रंगांमधील कपड्यांची रेंज शालिमार, मेनरोड परिसरात उपलब्ध झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सैलसर कपड्यांचा ट्रेंड सर्वाधिक दिसून येत आहे. मुलींसाठी प्रिंटेड प्लाझो पँट्स या खास उन्हाळ्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. सुती स्लिवलेस टॉप आणि प्रिंटेड कॉटन स्कर्ट या काँबिनेशनचीही मोठी चलती आहे. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल शॉर्टस्मध्ये विविध व्हरायटीज् उपलब्ध झाल्या आहेत. सध्या हातमागावर तयार होणार्‍या मुलायम कपड्यांचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. डेनिम व कॉटन ट्रेंड यातही प्लेन व प्रिंटेड कपड्यांचा पर्याय ग्राहकांसाठी दुकानदारांकडून उपलब्ध करुन दिला जात असल्याचे विक्रेत्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

कॉटन कपड्यांमुळे उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास कमी होतो. तसेच, उन्हाचा चटकाही कमी बसतो. शरीरावर कोणताही दुष्परिणामही होत नाही. त्यामुळे खादीच्या कपड्यांना पूर्वीपेक्षाही अधिक पसंती मिळते आहे. व्हाईट कॉटनचे खादीमध्येच तब्बल १२ ते १३ प्रकार आहेत. भरघोस डिस्काउंट मिळत असल्याने महिला वर्गानेही खरेदीसाठी अनुकूलता दाखवली आहे. सुती नाईटसेटदेखील आगळ्या-वेगळ्या स्वरूपात आणि माफक किमतीत उपलब्ध झाले आहेत.

उन्हाळ्यात कपडे वापरण्याच्या टिप्स :

  • उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. सुती कपडे घाम शोषून घेतात.
  •  उन्हाळ्यात फिकट रंगांच्या कपड्यांना अधिक प्राधान्य द्या
  •  गडद रंगाचे कपडे अधिक उष्णता शोषून घेत असल्याने असे कपडे टाळावेत
  • एकाच पॅटर्नचा कंटाळा येत असल्यास खादीत वेगवेगळ्या प्रिंटचे, चेक्स, प्लेन असे पर्याय निवडा.

स्कार्फ आणि सनग्लासचाही विक्रमी सेल

उन्हाळ्यात तीव्र सूर्य किरणांपासून चेहर्‍याचा बचाव करण्यासाठी महिला स्कार्फला पसंती देतात. यंदा अनेक पॅटर्न आणि डिझाईनचे स्कार्फ बाजारात उपलब्ध झाले आहेत. किरकोळ बाजारात १५० रुपयांपासून स्कार्फ, स्टोल मिळत आहेत. यामध्ये बोहो स्टाईल, चंकी, क्लासिक, मिक्स प्रिंट, वेलवेट, फेदरप्रिंट प्रकारातील स्कार्फला अधिक पसंती मिळत आहे. हानीकारक यूव्ही किरणांपासून बचाव होण्यासाठी नागरिक सनग्लासेसचा वापर करताना दिसून येत आहेत. १०० रुपयांपासून हे सनग्लासेस उपलब्ध आहेत.

- Advertisement -

ऑफर्सची रेलचेल 

ग्राहकांना आकर्षिक कारणासाठी लहान-मोठ्या ग्राहकांनी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यात ३० ते ४० टक्के सूट, एक ड्रेसच्या खरेदीवर दुसरा ड्रेस फ्री अशा ऑफर्सचा समावेश आहे.

या उन्हाळ्यात युवक-युवतींबरोबरच महिला आणि पुरुषदेखील खादी व सुती कपड्यांना पसंती देत आहेत. हातमागावर तयार होणार्‍या मुलायम कपड्यांनादेखील यावेळी चांगली मागणी आहे. स्कार्फमध्येही यावेळी ८ ते १० नवीन प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.- प्रितम आहेर, पी. एस. बुटीक

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -