घरमहाराष्ट्रमहागाई विरोधात युवासेनेचे 'थाली बजाओ' आंदोलन

महागाई विरोधात युवासेनेचे ‘थाली बजाओ’ आंदोलन

Subscribe

वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन सर्वच स्तरावरून मोदी सरकार व भाजपावर टीका केली जात आहे. याच महागाईच्या मुद्द्यावरून आता युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या महागाईच्याविरोधात आाज उठवला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात 'थाली बजाओ' आंदोलन युवासेनेच्यावतीने करण्यात येत आहे.

सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसंच, वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन सर्वच स्तरावरून मोदी सरकार व भाजपावर टीका केली जात आहे. याच महागाईच्या मुद्द्यावरून आता युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या महागाईच्याविरोधात आाज उठवला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन युवासेनेच्यावतीने करण्यात येत आहे.

या संदर्भात एक व्हिडीओ बनवत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मोदी सरकार व भाजपावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातील थाळी वाजवत ”बहौत होगई महेंगाई की मार अबकी बार मोदी सरकार, अबका युवा ना होगा बेरोजगार अबकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा आणि आश्वासन देत भाजपानं २०१४ व २०१९ साली भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली. पण आजची परिस्थिती काय पेट्रोलचे दर हे ११५च्या पुढे गेलेले आहेत. डिझेलने शंभरी पार केलीये. रोजचा सर्वसमान्यांना लागणारा गॅस हा महाग होत चालला आहे. जनसामान्यांना लागणाऱ्या ज्या जीवनाश्यक गोष्टी आहेत, त्या महाग होत चालल्या आहेत. मग भाज्या असतील, अंडी असतील किंवा इतर काही असेल. सगळ्याचे दर हे दररोज वाढत चालेले आहे”, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.

- Advertisement -

“आधिच कोरोनाच्या या संपुर्ण काळामध्ये युवकांच्या नोकऱ्या गेल्या असून आतातर बेरोजगारीनं एक नवा उच्चांक गाठलाय. त्यामुळं या अच्छेदिनांचा आभिनंदन करण्यासाठी युवासेनेच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन करणार”, असंही वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.

इमानदार मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी औरंगाबादमध्ये युवासेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील शिवेसेनेच अनेक नेते उपस्थित होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तोंडभरुन कौतुक केले. तसेच, विरोधकांना शेलक्या शब्दात टोलाही लगावला.

”आज विरोधकांना वाटते की, शिवसेनेच्या नेत्यांची मीडियामध्ये बातम्या आल्या म्हणून त्यांची बदनामी होईल. पण, मी विरोधकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासोबत दौऱ्यावर यावे. आमच्यासोबत आल्यावर तुम्हाल लक्षात येईल, महाराष्ट्रातला युवक आज उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे. तुम्ही कितीही बदनामी करा, त्याने काही फरक पडणार नाही. आज महाराष्ट्राला सर्वात स्वच्छ आणि इमानदार मुख्यमंत्री लाभला आहे,” असं सरदेसाई म्हणाले होते.


हेही वाचा – Raj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘एखादं व्याख्यान देऊन पुन्हा ३-४ महिने गायब’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -