घरआतल्या बातम्याझेडपी : पोषण ट्रॅक अ‍ॅपवर 96 टक्के आधारकार्ड पडताळणी

झेडपी : पोषण ट्रॅक अ‍ॅपवर 96 टक्के आधारकार्ड पडताळणी

Subscribe

 

नाशिक । महिला व बाल विकास विभागाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर अ‍ॅपमध्ये जिल्ह्यातील ४ लाख २९ हजार ४७८ लाभार्थ्यांपैकी ४ लाख १४ हजार २१ म्हणजेच ९६ टक्के लाभार्थ्यांचे आधार कार्ड पडताळणी पुर्ण झाली आहे. लवकरच ही आकडेवारी शंभर टक्क्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न असल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास प्रकल्प विभागातर्फे सांगण्यात आली आहे.
पोषण ट्रॅकर अ‍ॅप सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश अंगणवाडी केंद्र आणि अंगणवाडी सेविकांच्या कामांवर लक्ष ठेवणे आणि त्यासंबंधीच्या सर्व सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे हा आहे. या अ‍ॅपद्वारे गर्भवती महिला, स्तनदा महिला आणि बालकांचे संपूर्ण लाभार्थी व्यवस्थापन उपक्रम सहज उपलब्ध करून दिले जात आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील नवजात बालकांपासून ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांपर्यंत आणि गरोदर महिलांपासून स्तनदा मातांपर्यंतचा सर्व डेटा पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. आता विभागाला मॅन्युअल डेटा ठेवण्याची गरज भासणार नाही. या अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लाभार्थींची माहीती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
या माहितीच्या आधारे स्तनदा मातांचा ट्रॅक, गर्भवती महिला आणि 6 वर्षांपर्यंतच्या बालकांची सद्यस्थिती या माध्यमातून समोर येणार आहे. यामध्ये काही संवेदनशील लाभार्थी असल्यास त्यांना तत्काळ उपचार किंवा तत्सम बाबींची आवश्यकता असल्यास ती पुरविण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमध्ये एकूण ४ लाख २९ हजार ४७८ लाभार्थी आहेत.

या लाभार्थ्यांमध्ये असलेल्या स्तनदा माता, गर्भवती महीला तसेच सहा वर्षांपर्यंतची बालके यांचा समावेश अशल्याने त्यांची संख्या कमी जास्त होत असते. त्यामुळे यांची माहीती एकत्रित करण्यासाठी लागणारा विलंब कमी करण्यासाठी स्मार्टफोन अंगणवाडी कर्मचार्‍यांना देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -