घरमुंबईट्रॅफिक वार्डन पैसे घेताना मोबाईल कॅमेर्‍यात कैद

ट्रॅफिक वार्डन पैसे घेताना मोबाईल कॅमेर्‍यात कैद

Subscribe

वाडा मार्गावर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘एंट्री’ वसुलीमुळे भिवंडीतील नदीनाका परिसरात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. खळबळजनक बाब म्हणजे महिन्यापूर्वीच हाच ट्रॅफिक वार्डन एका अवजड ट्रक चालकाकडून वसुली करताना व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद झाला होता. त्यावेळीही वसुली करतानाचा व्हायरल व्हिडिओ प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र त्याच्यावर कारवाई न झाल्याने त्याची हिंमत वाढली. अन् तोच ट्रॅफिक वार्डन वाहतूक पोलिसांच्या आशिर्वादाने अवजड ट्रक चालकाकडून वसुली करतानाचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. यामुळे आता तरी या हफ्तेखोर ट्रॅफिक वार्डनसह त्याच्यासोबत असलेल्या वाहतूक पोलिसांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भिवंडी शहरालगतच्या नदीनाका येथे वाहतूक पोलिसांनी नेमलेले ट्रॅफिक वार्डन हे पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवून अवजड वाहनचालकांकडून पैसा वसुली करण्याच्या कामात नेहमीच व्यग्र असल्याचे या व्हिडिओमुळे समोर आले आहे. भिवंडी शहरात एमएमआरडीएच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे अवजड वाहनांना शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक विभागाने जड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तरी देखील दिवसभर अवजड वाहनाकडून वाहतूक पोलीस १०० ते २०० रुपये एंट्री वसुली करत असल्याचे एका कारमधील प्रवाशाने त्यांच्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद करून व्हिडीओ व्हायरल केला आहे.

- Advertisement -

भिवंडी शहरातील कल्याण – वाडा तसेच नाशिक, ठाणे, कल्याण आदी प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यावरून वाहनांची ये – जा करताना या प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होवून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करत चालकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे. या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबतच ट्रॅफिक वार्डन नेमण्यात आले आहेत. मात्र शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे सोडून हे पोलीस हप्ते घेत असताना एका कारमधील प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला. एकंदरीतच शहरातील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून आल्याने या हफ्तेखोर वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -