घरताज्या घडामोडीमहापालिकेच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा आकडा शंभरपार

महापालिकेच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा आकडा शंभरपार

Subscribe

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांसह १०६ अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत सुमारे २ हजार ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाच्या काळात योद्धासारखे काम करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाशी लढता लढता शहिद व्हावे लागले. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांसह १०६ अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत सुमारे २ हजार ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

२७०० जणांना बाधा

मुंबईत कोरेानाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आल्यानंतर महापालिकेच्या २४ विभागांचे सहायक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या उपाययोजना राबवण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या विभाग कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध खात्यांचे आणि विभागांचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या एकूण २ हजार ६८६ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील अनेक कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, यापैकी २० जुलैपर्यंत १०६ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामगारांचा कोरेानामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

१०६ जणांचा मृत्यू

महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे धारावीत अन्न वाटपाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मधुकर हरियाण यांचा कोरेानामुळे पहिला मृत्यू झाला. कोरेानामुळे शहिद झालेल्या हरियाण यांच्यानंतर प्रभारी उपायुक्त आणि प्रमुख अभियंता शिरिष दिक्षित आणि एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्या सह १०६ अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे कोरेानामुळे मृत्यू झाला आहे. एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांच्या निधनानंतर महापालिकेचे सर्व सहायक आयुक्त, प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोक खैरनार यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलत दाटीवाटीच्या झोपडपट्टयांमधील कोरेाना नियंत्रणात आणताना वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील कोरेानाच्या आजाराच्या संसर्गावर मात करत त्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले होते.

तर सहआयुक्त धामणे, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सल्लागार महेश नार्वेकर, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता संजय जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व कामगार हे कोरोना बाधित झाले होते. तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची विमा संरक्षणाची मदत मिळेपर्यंत त्यांचे पगार सुरूच ठेवावेत अशी मागणी केली आहे. आतापर्यंत मृतांचे नातेवाईक क्वारंटाईन असल्याने तसेच मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो. तर अनुकंपा तत्वावर आतापर्यंत केवळ एकच अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या: १०६
कोरोनाबाधित २६८६


हेही वाचा – महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोनाबाधित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -