घरमुंबईरेल्वे अपघातात १४ वर्षांच्या रुणालीने दोन्ही पाय गमावले, तिच्याच वयाच्या अहन...

रेल्वे अपघातात १४ वर्षांच्या रुणालीने दोन्ही पाय गमावले, तिच्याच वयाच्या अहन सेनने उभी केली मदत

Subscribe

रेल्वे अपघातात गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय गमवावे लागलेल्या रुणाली हेमंत मोरे या 14 वर्षांच्या मुलीच्या मदतीला मुंबईतील अहन सेन हा 14 वर्षांचा मुलगा धावून आला आहे. त्याने रुणालीच्या उपचारासाठी २ लाख ३८ हजार रुपयांची मदत करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

रेल्वे अपघातात गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय गमवावे लागलेल्या रुणाली हेमंत मोरे या 14 वर्षांच्या मुलीच्या मदतीला मुंबईतील अहन सेन हा 14 वर्षांचा मुलगा धावून आला आहे. त्याने रुणालीच्या उपचारासाठी २ लाख ३८ हजार रुपयांची मदत करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. अहन सेनला रुणालीच्या अपघाताची माहिती समाज माध्यमाच्या माध्यमातून मिळाताच. त्याने क्राउड फंड पेज तयार करून ही माहिती आपल्या कुटूंबासह मित्र परिवारामध्ये शेअर करत मदतीचे आवाहन केले. विशेष म्हणजे अपघात झाल्यापासून अवघ्या १४ दिवसांतच अहनने रुणालीला तब्बल सव्वा दोन लाख मिळवून दिले.

रेल्वे अपघातात पाय गमवलेली रुणाली हेमंत मोरे ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहते. १४ ऑगस्ट २०१८ ला रूणाली १० वीच्या क्लासेसची माहिती घेण्यासाठी ठाण्याच्या रेल्वे स्थानकावर आली होती. ९ वीत शिकणार्या रुणालीला रेल्वे स्थानकाची गर्दी नवीन होती. ती बिथरलेल्या अवस्थेत असताना तिला अज्ञात व्यक्तिचा धक्का लागल्याने ती रेल्वेखाली पडली. त्यात तिला गुडघ्यापासून खाली दोन्ही पाय गमवावे लागले. रुणालीच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तिच्या वडिलांना एक डोळ्याने दिसत नाही.आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मानपाड्यात एका भाड्याच्या खोलीत हा परिवार राहतो. अपघातामुळे मोरे कुटुंबियांबर मोठे संकट कोसळले आहे. रूणालीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी लोकांकडे मदतीची याचना केली होती. ही माहिती मुंबईतील बी.डी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणार्या अहन सेनला कळताच त्याने रुणालीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याने इंटरनेटवर ऑनलाईन क्राउड फंडच्या खाते तयार करून त्यांची लिंक आपल्या कुटूंबाला आणि मित्र परिवारात शेअर केली. सोबतच रुणालीच्या अपघाताविषयी मोबाईलच्या माध्यमातून माहिती दिली. अहनच्या कुटूबियांनी त्याला सहकार्य करत मदत गोळा केली.

- Advertisement -

अहन सेनच्या मदतीविषयी रुणालीच्या आईवडिलांना विचारले असता, त्यांनी याविषयी काही सांगण्यास नकार दिला. मात्र हा नकार देताना रुणालीच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र रुणालीचे नातेवाईक ‘आपलं महानर’शी बोलताना म्हणाले की, अहन सेनच्या मदतीमुळे आम्हाला खूप मोठे सहाय्य मिळाले आहे. त्याचे आम्ही सदैव ऋणी राहणार आहोत. हा मुलगा आमच्यासाठी नाही तर समाजासाठीसुद्धा एक आदर्श आहे. रुणालीवर ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील स्पर्श रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकरच ती घरी येईल, अशी माहिती रुणालीच्या नातेवाइकांनी दिली.

डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न…
विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे रुणालीचे स्वप्न आहे. रुणालीच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. रुणालीच्या शिक्षणासाठी आई घरकाम तर वडील मिळेल ते काम करतात. यातच रूणालीला अपंगत्व आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. रूणालीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी लोकांकडे मदतीची याचना केली आहे.

अहन सेन या १४ वर्षाच्या मुलाने रुणालीच्या उपचारासाठी मदत उभी करून सर्व मुलांसाठी आदर्श ठेवला आहे. मनात कोणताही स्वार्थ न ठेवता अहन सेनने केलेली मदत कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे रुणालीवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे.
– निलेश राव, अपघातग्रस्त मुलीचे नातेवाईक.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -