घरमुंबईदहा महिन्यात ट्रान्स हार्बरवर १४० बळी तर १०७ प्रवासी जखमी

दहा महिन्यात ट्रान्स हार्बरवर १४० बळी तर १०७ प्रवासी जखमी

Subscribe

रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही गेल्या १० महिन्यात नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावर १४० प्रवाशांचा विविध दुर्घटनांमध्ये बळी गेला आहे. तर १७० प्रवासी जखमी झाले आहेत.

रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही गेल्या १० महिन्यात नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावर १४० प्रवाशांचा विविध दुर्घटनांमध्ये बळी गेला आहे. तर १७० प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती, सुचना करुन देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळेच या दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

११ रेल्वे स्थानकात घडल्या घटना

ट्रान्स हार्बर मार्गावरील ११ रेल्वे स्थानकांतर्गत यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान १४० बळी तर १०७ प्रवासी जखमी झाल्याच्या दुर्घटना घडल्या असून त्याची नोंद रेल्वे पोलीस दप्तरी करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नंदकिशोर सस्ते यांनी दिली आहे.

- Advertisement -

जानेवारी ते ऑक्टोबर १४० मृत्यू

रुळ ओलांडून ५८ पुरुषांचा मृत्यू झाला आहे तर ५ स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर लोकलमधून पडून ४२ पुरुषांचा तर ९ स्त्रियांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २१ पुरुषांचा आणि ५ स्त्रियांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर १०७ जखमी

रुळ ओलांडून १७ पुरुष जखमी झाले आहे तर २ स्त्रिया जखमी झाले आहेत. तर लोकलमधून पडून २४ पुरुष तर २२ स्त्रिया जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर ६६ पुरुषांचा आणि १९ स्त्रिया नैसर्गिकरित्या जखमी झाल्या आहेत.

- Advertisement -

नियमांचे उल्लंघन

अनेकदा गर्दी असूनही प्रवासी त्या लोकलमध्ये प्रवेश करतात आणि दरवाजावर लोंबकळत असतात. तर काही प्रवासी मोबाईलच्या वेडापायी कानात हेडफोन लावणे, सेल्फीच्या मोहात असताना लोकलमधून पडून जखमी होतात. तर काहींचा मृत्यू होतो. तर काहींचा घाई गडबडीत लोकल पकडण्याच्या नादात मृत्यू होतो. तर अनेकदा विविध वादग्रस्त घटना, ताणतणाव आदींमुळे काहींना आपले जीव गमवावे लागतात.

या मार्गावर अधिक अपघात

वाशी लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील ठाणे ते वाशी, वाशी ते पनवेल, गोवंडी ते सीवूड या ट्रान्स हार्बरमार्गावरील गोवंडी, मानखूर्दनाका तसेच तुर्भे, रबाळे, सानपाडा येथील गर्दीच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त आहे.


हेही वाचा –  Video: भांडूप कॉम्प्लेक्समध्ये पाईपलाईन फुटली, आज पाणी नाही!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -