घरमुंबईरॅगिंग प्रकरणी 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

रॅगिंग प्रकरणी 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Subscribe

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या महिला डॉक्टरची तक्रार,पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फ्रेशर्स पार्टीच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत छळ केल्याची तक्रार एका पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेल्या महिला डॉक्टरने तक्रार केल्यानंतर पालघर पोलिसांनी पालघर येथील डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातील 15 डॉक्टरांंविरोधात रॅगिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक येथील डॉ. प्रियंका शुक्ला यांनी होमिओपॅथिक पदव्युत्तर शिक्षणासाठी डॉ. ढवळे महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या 30 विद्यार्थिनी आणि 31 विद्यार्थ्यांची तुकडी सोमवारी महाविद्यालयात दाखल झाली होती. त्यात प्रियंका शुक्ला यांचाही समावेश होता. या तुकडीमधील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार्‍या फ्रेशर्स पार्टीच्यानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गुरुवारी रात्री हॉस्पिटलमधील दैनंदिन काम आटोपून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वरिष्ठ डॉक्टरांनी आपला मानसिक छळ केला. त्यानंतर काही दिवस आपल्याला अपमानास्पदरित्या वागवले. फ्रेशर्स पार्टीच्या निमित्ताने रात्री उशिराने बैठक आयोजित करून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार डॉ. शुक्ला यांनी पालघर पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी हॉस्पीटलमधील 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रॅगिंग अधिनियम कलम चार नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

- Advertisement -

फ्रेशर्स पार्टीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी बैठकीचे गुरुवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. या नियोजित कार्यक्रमात तसेच बैठकीमध्ये सहभागी होण्याचे नव्याने दाखल विद्यार्थ्यांना ऐच्छिक होते. त्यात कुणालाही मानसिक त्रास अथवा रॅगिंगचा प्रकार झाल्याची कुणाही विद्यार्थ्यांची तक्रार नाही. डॉ. शुक्ला यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क न साधता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतरही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्राचार्य आणि अँटी रॅगिंग सेलच्या अध्यक्षांशी बोलण्यास नकार दिला. याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून महाविद्यालय पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. तसेच महाविद्यालयाकडूनही चौकशी सुरू आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आनंद कापसे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -