घरमुंबईआता महिला करणार लालपरीची देखभाल

आता महिला करणार लालपरीची देखभाल

Subscribe

७६६ महिला मेकॅनिक एसटीत कार्यरत

एसटी बस बंद पडली की एसटीचे पुरूष मेकॅनिक ती दुरुस्त करत असल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. पण यापुढे महिला मेकॅनिक एसटी दुरुस्त करताना दिसल्यास नवल वाटायला नको. एसटीच्या मेकॅनिक विभागात आतापर्यंत असलेली पुरूषांची मक्तेदारी आता संपुष्टात आली आहे. एसटी महामंडळात एसटी बसची देखभाल आणि दुरुस्तीसाठी ७६६ महिला मेकॅनिक कार्यरत आहेत.

महिला शिक्षणाचा प्रसार झाला आणि सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. एसटी महामडळामध्येही अशीच क्रांती झाली आहे. एसटीमध्ये क्लार्क, अधिकारी अगदी कंडक्टरपदीही महिला कार्यरत आहेत. आतापर्यत एसटी चालक आणि एसटीच्या मेकॅनिक विभागाता मात्र पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र २०१८ सालापासून एसटीने महिला मेकॅनिकची एसटी महामंडळात भरती केली आहे. सध्या एसटीच्या मेकॅनिक विभागात ७६६ महिला कार्यरत आहेत. एसटीचे स्पिंग बदलणे,क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे यांसारखी अवजड कामे एसटी महामंडळातील महिला मेकॅनिक करत आहेत. एसटी महामंडळाने २०१८ पासून जेव्हा महिला धोरण स्वीकारले. तेव्हापासून एसटीच्या दुरुस्तीपासून ते बस चालविण्यापर्यत सर्वात क्षेत्रात महिलांना प्राधान्य दिले आहे.

- Advertisement -

6 हजार पेक्षा जास्त महिला कर्मचारी
एसटी महामंडळात एकूण 1 लाख 25 हजार एसटी कर्मचारी आहेत. तसेच 18 हजार 500 बसेसच्या ताफा आहे. राज्यभरात एसटीचे जाळे असून मोठ्या प्रमाणात एसटीचे प्रवासी आहेत. सद्या परिस्थिती एसटी महामंडळात 6 हजार पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. त्यात सर्वाधिक ४ हजार ५०० महिला एसटी वाहकपदावर कार्यरत आहेत. तर ७६६ महिला एसटीच्या मेकॅनिकल विभागात आहेत. आता वाहक पदासाठी 532 महिला दाखल होणार आहेत.

मेकॅनिक विभाग
प्रमुख कारागिरी =१
कारागीर क = १३
सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक =३९
सहाय्यक कारागिरी =८९
सहाय्यक = ६२४

- Advertisement -

एकूण ७६६ महिला

महिला वाहक =4 हजार 500
महिला चालक = ५२३

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -