घरCORONA UPDATEठाणे पोलीस दलातील दोन पोलिसांचा मृत्यू

ठाणे पोलीस दलातील दोन पोलिसांचा मृत्यू

Subscribe

ठाणे पोलीस दलातील दोन पोलीसांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एकाचा मृत्यू कोरोनाने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत असून मृत्यूनंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आलेली असून अद्याप अहवाल आलेला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यातील असणारे ४५ वर्षीय पोलीस कर्मचारी हे गुरुवारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. रात्री ते ड्युटी संपवून घरी गेले असता त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, कळवा वाहतूक विभागात असलेले ५६ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे शुक्रवारी रात्री कर्तव्य बजावून घरी गेले असता त्यांना घरी आल्यावर अस्वस्थ जाणवू लागल्यामुळे त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती कळवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे कळव्यातील खारेगाव येथे कुटुंबासह राहत होते. त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी झालेल्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -