घरमुंबईकसारा घाटात 300 मीटर रस्त्याला गेले तडे

कसारा घाटात 300 मीटर रस्त्याला गेले तडे

Subscribe

एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू

कसारा-शहापूर तालुक्यातील कसारा घाट परिसरातील जोरदार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि रेल्वे घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच महामार्गावरील जुन्या घाटात रस्त्याला तडे जाण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास घाट मार्गावर असलेल्या आंबा स्थळाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला ठिकठिकाणी तडे गेले होते. या घटनेनंतर याच मार्गावर एकेरी वाहतूक धीम्या गतीने सुरू ठेवण्यात आली होती. अशावेळी महामार्ग पोलिसांनी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून तडे गेलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनचालकांना सूचना देत वाहने एका बाजूने काढण्याचे काम केले.

अतिवृष्टीमुळे जवळपास 300 मीटरच्या अंतरापर्यंत रस्त्याला तडे गेल्याचे महामार्गाच्या पोलिसांच्या लक्षात आल्याने वेळीच खबरदारी घेण्यात आली. शहापूर तहसीलदार यांनी संबंधित कंपनीला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पिकइन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पोहचून काम हाती घेतले. मात्र, संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. पावसाची संततधार कायम असल्याने रस्ता खचण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत काम करत असलेल्या कंपनीमार्फत नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून मुंबई नाशिक महामार्गावर पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन मे अखेर पूर्ण करण्यात आले. मात्र, जुलै महिन्यात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे घाट मार्गाच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने ठेकेदाराच्या कामाचे पितळ उघडे पडल्याने पुन्हा ठेकेदाराने रस्ता बंद करून भर पावसात काम सुरू करून सारवासारव केली. तरीसुद्धा दुरुस्तीचे काम करून रस्त्याला तडे गेले कसे? हा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -