घरमुंबईभिवंडी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावर ४२ नगरसेवकांचा बहिष्कार

भिवंडी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावर ४२ नगरसेवकांचा बहिष्कार

Subscribe

भिवंडी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरे यांना होत असलेल्या वाढत्या विरोधाने काँग्रसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांचे मतदार आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी प्रचार कार्यालय उघडण्यास सुरवात झाली आहे. त्या अनुशंगाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश टावरे यांनी गोपाळनगर येथे प्रचार कार्यालय सुरु केले असून, त्याचे उद्घाटन महापौर जावेद दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाच्या ४२ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवून अघोषित बहिष्कार केल्यामुळे काँग्रेस पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित न केल्यामुळे त्यांनी देखील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सुरेश टावरे यांना नाराज मुस्लिम नगरसेवकांचा सामना करावा लागणार आहे.

बाळ्या म्हात्रेंच्या उमेदवारीची मागणी

भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती. त्यामुळे बहुसंख्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सुरेश टावरे यांना विरोध दर्शवित सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेस नगरसेवकांचा आवाज बंद केला. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान, गट नेते हालीम अंसारी , सभागृह नेते मतलूब सरदार खान यांच्यासह ४२ नगरसेवकांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या निवडणूक प्रचार कामात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

महापौरांची मध्यस्ती

महापौर जावेद दळवी यांनी मध्यस्थी करून नाराज नगरसेवकांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयस्वी ठरले आहेत. निवडणूकी निमित्त प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावर ४२ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकून निषेध केला आहे. या घटनेने भिवंडीत काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. असे असताना कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी देखील पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांची कोंडी झाली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -