घरमुंबईभाजपा कार्यालयात 53 वर्षांच्या महिलेचा विनयभंग

भाजपा कार्यालयात 53 वर्षांच्या महिलेचा विनयभंग

Subscribe

बोरिवलीतील घटना; वॉर्ड अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल, तक्रार केली म्हणून महिलेस कार्यालयात बेदम मारहाण

भाजपा कार्यालयात एका 53 वर्षांच्या महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. पोलिसांनी तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती, असा आरोप या महिलेने केला आहे. अखेर बोरिवली पोलिसांनी भाजपा कार्यालयात वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम करणार्‍या प्रतिक साळवीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेने काही भाजप महिला कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

53 वर्षांची ही महिला बोरिवली परिसरात राहत असून त्या समाजसेविका म्हणून कार्यरत आहेत. समाजसेवेची आवड असल्याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्या बोरिवलीतील भाजपाच्या वॉर्ड क्रमांक 16 कार्यालयात गेल्या होत्या. तिथेच त्यांची प्रतिक साळवीशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी त्यांना भाजपामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. प्रतिकने त्यांना काम करण्यास सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर त्यांना वॉर्ड क्रमांक सोळाच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता प्रतिकने त्यांना भाजपा कार्यालयात बोलाविले होते.

- Advertisement -

कार्यालयात गेल्यानंतर त्याने कार्यालयाचे शटर बंद केले आणि लॉक करून लाईट बंद केले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी लाईट बंद का केली याबाबत विचारणा केली असता त्याने कार्यालय चालू असल्याचे कोणालाही कळू नये म्हणून लाईट बंद केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्या उजव्या मांडीला आणि खांद्याला हात ठेवून त्यांच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पक्षात काम करायचे असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तसेच मला जे आवडते ते मी सोडत नाही, ते मी मिळवतोच असे सांगून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर त्या तेथून निघून गेल्या. या घटनेनंतर त्यांनी आमदार सुनिल राणे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रतिक साळवी याची तक्रार केली होती. याबाबत तिने त्यांना तक्रार अर्जही दिला होता. त्यानंतर 18 ऑगस्टला स्थानिक नगरसेविका आशावरीताई पाटील यांनी त्यांना कॉल करून अंजलीताई खेडेकर यांच्या पक्ष कार्यालयात बोलाविले होते. यावेळी त्यांनी प्रतिकविरोधात तक्रार का केली असा उलट सवाल करून त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्यांना पक्षात पद हवे आहे म्हणून हा आरोप केल्याचे सांगून त्यांना रेश्मी निफळे हिने कानशिलात लगावली.

- Advertisement -

त्यानंतर आश्विनी देसाई, आशावरीताई पाटील, अंजली खेडेकर यांनीही त्यांना कार्यालयात बेदम मारहाण करून कार्यालयाबाहेर काढले. तसेच पुन्हा कार्यालयात येऊ नये अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आल्या. मात्र, त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. या घटनेनंतर त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सतेज पाटील यांनी बोरिवली पोलिसांना तक्रारदार महिलेच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -