घरमुंबईबिकेसीतील आरोग्य केंद्रासाठी खर्च झाले ५४ कोटी रुपये

बिकेसीतील आरोग्य केंद्रासाठी खर्च झाले ५४ कोटी रुपये

Subscribe

एमएमआरडीए, मुंबई महापालिकेकडून करणार वसूल केंद्रातील साहित्याचा वापर मात्र एमएमआरडीए आणि शासन करणार

वांद्रे-कुर्ला संकुलात (बिकेसी) एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या समर्पित आरोग्य केंद्रासाठी सुमारे ५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम आता एमएमआरडीए, मुंबई महापालिकेकडून वसूल करणार आहे. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय साहित्य शासनाच्या रुग्णालयात उपलब्ध करून दिले जाणार असून इतर साहित्याचा वापर एमएमआरडीएच्या कार्यालयात केला जाणार आहे. त्यामुळे कोविडच्या नावाखाली शासनाकडून महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याची बाब समोर आली आहे.

देशातील हे पहिले असे खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल) आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोनाबाधित रुग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे. २ मे रोजी काम सुरु होवून ते १६ मे रोजी पूर्णत्वास आले. अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसात हे कोविड-१९ केअर सेंटर उभारले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायलाही हवं – शरद पवार


या केंद्राची क्षमता १ हजार २६ खाटांची आहे. यापैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. सोबत १० मोबाईल आयसीयू बेड आहेत. सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत हे कोविड-१९ केअर सेंटर तयार केले आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह सुसज्ज आहे. यासाठी एमएमआरडीएने ५४.१४ कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी वस्तू व सेवा खरेदीस नेमलेल्या कोविड संदर्भातील समितीला प्राधिकरणाने कार्योत्तर परवानगी दिली आहे.
यामध्ये कोविड रुग्णालयाची आवश्यकता संपल्यानंतर तेथील उपकरणे व वैद्यकीय सामग्री राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यास व उर्वरित इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे प्राधिकरण यांच्या वापरात मान्यता देण्यात येत असल्याचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावात कोविडच्या या समर्पित आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. त्यामुळे यावरील खर्च वसूल करण्यास अथवा समायोजन करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

वांद्रे-कुर्ला संकुल एमएमआरडीए मैदान
८०० ऑक्सिजनसह खाटा
१५० आयसीयू खाटा
एकूण खर्च: ५४.१४ कोटी रुपये

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -