घरमुंबईशिवडी टीबी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सतावतेय टीबीची भीती

शिवडी टीबी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सतावतेय टीबीची भीती

Subscribe

पाच वर्षात ६६ कर्मचाऱ्यांना टीबीने ग्रासले

आशियातील सर्वात मोठ्या असलेल्या आणि एकमेव असणाऱ्या शिवडी टीबी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून टीबी होण्याची भीती सतावतेय. कारण, त्यांना दिला जाणारा पोषक आहार गेल्या काही महिन्यांपासून बंद केला गेला आहे. ते टीबीच्या विळख्यात अडकणार नाहीत ना? या भीतीने सध्या त्यांची झोप उडाली आहे. गेल्या ५ वर्षांत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ६६ कर्मचारी टीबीने ग्रासले होते. तर, यापैकी १७ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि नर्सेसचा समावेश आहे.

टीबी हा संक्रमणाद्वारे होणारा आजार आहे. जो खोकल्यानंतर, शिंकल्यामुळे पसरतो. त्यामुळे, रुग्णांमध्ये वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना जंतूचा संसर्ग होऊ नये, यासाठी २०१६ पासून पोषक आहार सुरू करण्यात आला होता. पण, गेल्या काही महिन्यांपासून हा पोषक आहार काही कारणांमुळे बंद झाला आहे. त्यात केळी, दूध, अंडी, चणे, शेंगदाणे आणि पोहे या आहाराचा समावेश करण्यात आला होता.

२०१६ मध्ये हा पोषक आहार सुरू करण्यात आला. पण, कॉन्ट्रॅक्टरने वीजेचे बील आणि पैसे दिले नसल्याने ही सेवा बंद आहे. पण, पुढच्या तीन-चार दिवसांत पुन्हा सुरू करणार आहेत. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी नर्सचा मृत्यू झाला होता. हे टेंडर २०२० च्या मार्चमध्ये संपणार आहे. शिवाय, हा पोषक आहार ४० रुपयांपर्यंतचा व्हावा असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पोषक आहार न दिल्यास ते पैसे किमान त्यांच्या पगारात द्यायचे असाही प्रस्ताव आहे.
-डॉ. ललितकुमार आनंदे , मुख्य वैद्यकीय अधीक्षक, शिवडी टीबी हॉस्पिटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -