घरमुंबईवीज चोरांना 'बेस्ट शॉक'; दोन वर्षांत ७ कोटींची वसुली

वीज चोरांना ‘बेस्ट शॉक’; दोन वर्षांत ७ कोटींची वसुली

Subscribe

बेस्ट उपक्रम अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात आहे. त्यातच वीज विभागाला वीज चोरीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र बेस्ट वीज विभागाच्या दक्षता पथकाने सतर्कता दाखवीत जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ या दोन वर्षाच्या कालावधीत तब्बल २ हजार ५३३ ठिकाणी धाडी टाकून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली. जवळजवळ १८ कोटींची वीज चोरी झाल्याचे समजते. मात्र बेस्टने ६ कोटी ९९ लाख रुपयांची दंड वसुली करून सदर वीज चोरांना ‘बेस्ट शॉक’ दिला आहे.

मुंबईत सध्या वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्याचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. तर दुसरीकडे बेस्ट वीज विभागाला वीज चोरीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र बेस्ट वीज विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, बेस्टच्या पथकाने गेल्या जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ या दोन – सव्वादोन वर्षाच्या कालावधीत तब्बल २ हजार ५३३ ठिकाणी धाडी टाकून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये, वीज चोरांकडून करण्यात आलेल्या वीज चोरीची सखोल माहिती घेऊन व त्याचे प्रमाण आणि त्याची किंमत ठरवून सदर वीज चोरांवर बेस्टच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, बेस्ट वीज विभागाने संबंधित चीज चोरांकडून ६ कोटी ९९ लाख रुपयांची दंड वसुली केली आहे.

- Advertisement -

अशी झाली कारवाई

जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ – २ हजार ५३३ वीज चोरीची प्रकरणे

एकूण १८ कोटी २१ लाख रुपयांच्या वीज चोरीचा दावा.

- Advertisement -

१,८१५ वीज चोरीच्या प्रकरणात ६ कोटी ९९ लाख रूपयांची वसुली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -