घरमुंबईमुंबईत अवयवदानाची पंच्याहत्तरी पूर्ण, दोघांना जीवदान

मुंबईत अवयवदानाची पंच्याहत्तरी पूर्ण, दोघांना जीवदान

Subscribe

मुंबईत एका ७५ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये मंगळवारी ७५ वं अवयवदान पार पडलं. याबाबत मुंबईतील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस.के. माथूर यांनी सांगितलं की, “जसलोक हॉस्पिटलमध्ये ७५ व्या अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे. एका ७५ वर्षीय महिलेने हे अवयवदान केले. यात दोन्ही किडनी दान करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मुंबईत ४८ अवयवदान झाले होते. पण, यंदा मुंबईने अवयवदानाची ७५ वी गाठली आहे.”

समन्वयकांची कामगिरी आणि करण्यात आलेल्या अवयवदानाच्या जनजागृतीमुळे अवयवदानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तर, देशभरात महाराष्ट्राने अवयवदानात पहिला क्रमांक पटकावला आहे. २०१९मध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक अवयवदान करण्यात आले. अवयवदानात महाराष्ट्र अव्वल आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याचा पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्राने अवयवदानात देशातील आघाडीच्या तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांना देखील मागे टाकलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -