घरमुंबईआचारसंहिता पथकाने पकडली ८ लाखांची रोख रक्कम

आचारसंहिता पथकाने पकडली ८ लाखांची रोख रक्कम

Subscribe

धारावी विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ८ लाखाची रोकड पकड्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई शहरात येणार्‍या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार धारावी येथे आज वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान, निवडणूक आयोगाला एका वाहनातून तब्बल ८ लाख १७ हजार रुपयाची रोकड आढळून आली आहे.

अशी पकडण्यात आली रक्कम

निवडणूक आयोगाच्या पथकामार्फत बुधवारी सकाळी १० वाजता सायन जंक्शन येथे एका पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान, निवडणूक आयोगाला तपासणी दरम्यान या गाडीत ८ लाख १७ हजार रुपये इतकी संशयित रक्कम पकडण्यात आली आहे. घाटकोपर येथे राहणारे धीरेन कांतीलाल छेडा (४२) यांच्या वाहनात ही रक्कम आढळून आली आहे. याप्रकरणी धारावी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती धारावी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पालिकेचे कर्मचारी खातायत अळ्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -