घरमुंबईमाझा अरविंदा आहे ना? ८५ वर्षीय आईची आर्त हाक

माझा अरविंदा आहे ना? ८५ वर्षीय आईची आर्त हाक

Subscribe

माझा अरविंदा आहे ना? कुठे गेला असेल तो ? असा प्रश्न विचारत एका डोळ्याने आणि एका कानाने अधु असलेली 85 वर्षीय वृद्धा सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या एलआयसी अधिकारी मुलाची आतुरतेने वाट पाहत देवाचा धाव करीत आहे.

माझा अरविंदा आहे ना? कुठे गेला असेल तो ? असा प्रश्न विचारत एका डोळ्याने आणि एका कानाने अधू असलेली ८५ वर्षीय वृद्धा सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या एलआयसी अधिकारी मुलाची आतुरतेने वाट पाहत देवाचा धाव करीत आहे. उषा रानडे या बोरीवलीतील एलआयसी कॉलनीत राहणार्‍या ८५ वर्षीय वृद्धा. त्यांचा एक डोळा अधू झालेला, कानाने नीट ऐकू येत नाही, आधाराशिवाय चालता येत नाही. औषधांच्या मात्रांवर उर्वरित आयुष्य तग धरून राहिलेले. अशा अवस्थेत त्यांचा एकुलता एक मुलगा अरविंद रानडे (५८) हे २१ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाले. अरविंद एलआयसीत फिल्ड ऑफिसर, मात्र अविवाहीत. कार घेऊन ते त्यादिवशी नायगांवला जाऊन येतो असे आईला सांगून गेले. सोबत त्यांचा चालक उत्तम सिंग आणि एलआयसी एजंट पिंटू शर्मा होते.

- Advertisement -

सायंकाळी उषा यांना घेरी आल्यामुळे त्यांनी अरविंदला मोबाईल कॉल केला. पण तो लागला नाही. त्यामुळे त्यांनी चालक उत्तमला फोन केला. त्यावेळी साहेब आपल्या सोबत नसून, त्यांना वसई-नायगांव पुर्वेकडील परेरानगरातील गोकुळ बिल्डींग क्र.2 मध्ये सोडल्यानंतर साहेबांच्या सांगण्यावरून आपण घरी परतल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तीन दिवस अरविंद यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे आजीच्या सांगण्यावरून चालक उत्तमने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. उत्तमच्या सांगण्यानुसार रानडे यांच्यासोबत एजंट शर्मा शेवटपर्यंत होते. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता,शर्माने हात वर केले.

उषा रानडे यांनी आपला भाचा श्रीनिवास पटवर्धन यांच्याद्वारे वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चालक पिंटु आणि एजंट शर्मा हेच अरविंद यांचा अरविंद बेपत्ता होण्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेवून चौकशी केली.त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. या घटनेला आता सहा महिने होत आले आहेत. तरीही रानडेंचा तपास लागलेला नाही. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या वृद्ध आईला कोणताही आधार उरलेला नाही. राहते घरही कंपनीचे असल्यामुळे बेघर होण्याची भिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपासून रानडे कामाला नसल्यामुळे त्यांना कंपनीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पगारही बंद करण्यात आला आहे. काही दिवसांनी नियमानुसार उषाबाईंना कंपनीचे घरही रिकामे करावे लागणार आहे. जवळ पैसा नाही, नातलग नाहीत, आजारांनी जर्जर झालेले शरीर घेवून कुठे जायचे,कसे जगायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

- Advertisement -

आधारच हरवलाघरातील अन्न सामुग्री,पदरचे पैसेही संपल्यामुळे उषा यांचे भाचे पटवर्धन यांच्यासह काही नातलग मदत करताहेत. पटवर्धनांनीही वयाची पंच्चाहत्तरी ओलांडली आहे. त्यांनाही कोणाचा आधार नाही. अशा परिस्थितीतही त्यांनी अरविंदचा तपास करण्याचा प्रयत्न केला, मात्र,थकलेल्या शरीराने त्यांना मर्यादा घातल्या आहेत. तरीही ते बोरीवली पूर्वेकडील आपल्या निवासस्थानाहून पश्चिमेकडील अरविंदाच्या घरी जावून मामीची काळजी घेत आहेत. त्यांना अरविंदा आहे ना? कुठे गेला असेल? असे प्रश्न विचारून उषा भंडावून सोडत आहेत.

पुढल्या वर्षी होणार निवृत्तपुढल्या वर्षी अरविंदा निवृत्त होणार, त्यानंतर पगार बंद होवून पेन्शनवर जगावे लागेल. त्यामुळे या वर्षीच त्याला भरपूर कपडे शिवलेत. ते घालायला तरी तो येईल. या आशेवर त्या दाराकडे अधू झालेली नजर लावून बसल्या आहेत. अरविंदाचा फोटो असलेला कप उराशी बाळगून त्या माळ घेवून जप करीत देवाचा धावा करताहेत.अशा बिकट परिस्थितीतून देवाचा चमत्कारच त्यांना वाचवू शकेल, अशी आशा त्यांना वाटतेय.

पोलिसांकडून कसून शोधपोलिसांनीही अरविंद रानडेंचा कसून शोध घेतला आहे. चार दिवस चालक उत्तम आणि एजंट शर्मा यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र,कोणताच सुगावा लागत नाही. त्यांचे फेसबुक,व्हॉट्सअ‍ॅप,मोबाईल डाटा सर्व तपासून झाले. पुण्यापर्यंत जावून शोध घेण्यात आला.अरविंद यांनी आपल्या खासगी गोष्टी कोणालाही शेअर केल्या नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.
– सुधीर धायरकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस स्टेशन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -