घरमुंबई१९ वर्षांच्या तरुणीवर तिघांचा सामुहिक बलात्कार

१९ वर्षांच्या तरुणीवर तिघांचा सामुहिक बलात्कार

Subscribe

साकिनाका येथील घटना; दोन आरोपींना अटक

लग्नाची मागणी घालत एका 19 वर्षांच्या तरुणीला डोंगरावर नेऊन तेथे तिच्यावर तीन नराधम तरुणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी सामुहिक बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पळून गेलेल्या तिघांपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. संकेत बाळकृष्ण पालकर आणि दिपक किसन उभेकर अशी या दोघांची नावे असून त्यांचा तिसरा सहकारी फरार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर या तिघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिडीत तरुणी 19 वर्षांची असून ती साकिनाका येथे तिच्या आई-आजीसोबत रहाते. मंगळवारी सकाळी तिला एका तरुणाने फोन करुन संघर्षनगर परिसरात बोलाविले होते. या तरुणाने तिला महत्त्वाचे काम असल्याचे सांगितले होते, त्यामुळे ती तिथे गेली होती. यावेळी तिला आरोपी तिच्या दोन मित्रांसोबत उभा असल्याचे दिसून आले. तिथे गेल्यानंतर त्यापैकी एकाने तिला प्रपोज करुन लग्नाची मागणी घातली. त्यानंतर ते तिघेही तिला तेथील डोंगराळ परिसरात घेऊन गेले होते. यावेळी या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला होता. त्यापैकी एकाने तिला घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. दुपारी तीन वाजता ते तिघेही पळून गेले होते.

- Advertisement -

या घटनेनंतर ती घरी आली अणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईसह आजीला सांगितला. त्यानंतर ते तिघीही साकिनाका पोलीस ठाण्यात गेले. घडलेला प्रकार त्यांनी पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना सांगितला. त्यानंतर या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुनिल माने व त्यांच्या पथकाने पळून गेलेल्या संकेत पालकर आणि दिपक उभेकर या दोघांनाही काही तासांत साकिनाका परिसरातून अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या दोघांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांचा तिसरा सहकारी पळून गेल्याने त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे पिडीत तरुणीने दिलेल्या जबानीची पोलिसांनी शहानिशा सुरु आहे. तिच्या तक्रारीत तथ्य आहे की नाही याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे. तसेच दोन्ही आरोपींची लवकरच वैद्यकीय चाचणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -