घरमुंबईपुणेकर महिलेमुळे कोल्हापुरातील तरुणाला मुंबईत जीवदान

पुणेकर महिलेमुळे कोल्हापुरातील तरुणाला मुंबईत जीवदान

Subscribe

पुण्यातील ६० वर्षीय महिलेचा ३१ डिसेंबरला ब्रेनडेड झाल्याने तिच्या कुटुंबियांनी अवयवदान निर्णय घेतला. त्यानुसार दान केलेले यकृत मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात आणून कोल्हापुरातील ३६ वर्षीय तरुणामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले.

पुण्यातील ६० वर्षीय महिलेचा ३१ डिसेंबरला ब्रेनडेड झाल्याने तिच्या कुटुंबियांनी अवयवदान निर्णय घेतला. त्यानुसार दान केलेले यकृत मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात आणून कोल्हापुरातील ३६ वर्षीय तरुणामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापुरातील या तरुणाला सरत्या वर्षात जीवदान मिळाले असून, नव्या वर्षाची नवी पहाट त्याच्या आयुष्यात आली आहे.

पुण्यातील ६० वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला अ‍ॅक्यूट सुबाराक्नोइड हॅमरेजसह निदान झाले हेाते. उपचारादरम्यान तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. डॉक्टर्स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या कुटुंबासोबत समुपदेशन केल्यानंतर त्यांनी तिचे यकृत, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, आतडे व कॉर्निया दान करण्याला संमती दिली. त्वरित प्रयत्न व योग्य वेळ व्यवस्थापनासह रिट्रायव्हल प्रक्रिया करण्यात आली. पुणे व मुंबईदरम्यान ग्रीन कॉरिडर करून महिलेचे यकृत मुंबईमध्ये आणण्यात आले. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोल्हापुरातील तरुणामध्ये हे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले. या तरुणाला अल्कोहोलिक लिव्हर डीसीजचे निदान झाल्यानंतर जुलै २०१९ पासून यकृत प्रत्यारोपण करण्याच्या प्रतिक्षेत होता. त्याचे जीवन वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव उपचार होता. महिलेच्या कुटुंबामध्ये तिचा पती, मुलगा व मुलगी यांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने कोल्हापूरमधील तरूणाला मुंबईत जीवदान मिळाले.

- Advertisement -

महिलेच्या कुटुंबियांनी अवयवदानाबद्दल घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कोरोना काळात अवयव दानाच्या कार्याला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे फोर्टिस हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लाण्ट अ‍ॅण्ड एचपीबी सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्ता यांनी सांगितले. अत्यंत अवघड काळात धाडसी निर्णय घेतलेल्या महिलेच्या कुटुंबियांबरोबरच प्रत्यारोपणात मदत केलेल्या वैद्यकीय टीम, परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते, झेडटीसीसी, वाहतूक पोलिस आणि सर्व ट्रान्सप्लाण्ट कोऑर्डिनेटर्सचे आभार मानते, असे फोर्टिस हॉस्पिटल्सच्या विभागीय संचालिका डॉ. एस. नारायणी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -