घरमुंबईआरतीची पुस्तके मोजताहेत शेवटच्या घटका

आरतीची पुस्तके मोजताहेत शेवटच्या घटका

Subscribe

आरतीची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे भक्तांच्या हातात पुस्तकांऐवजी मोबाईल दिसू लागले आहेत. एकाने गणपतीची आरती डाऊनलोड करायची आणि ती सर्वांना शेअर करायची.

गणरायाच्या आरत्या अलीकडच्या काळात ऑनलाईन उपलब्ध होत असल्यामुळे आरत्यांची छापील पुस्तके शेवटच्या घटका मोजू लागली आहेत. गणपतीच्या आरत्या सगळ्यांनाच तोंडपाठ नसल्यामुळे घरोघरी आरत्यांची पुस्तके दिसून येत असत. पुस्तकांशिवाय आरती करता येत नव्हती. गणपतीची स्थापना करताना लागणार्‍या आवश्यक वस्तूंमध्ये आरतीचे पुस्तक हमखास असायचे. ही पुस्तके धार्मिक भावनेने व्यवस्थित जतन केली जात. या पुस्तकांद्वारे घरोघरी पोहोचता येत असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष, संघटना, मंडळे, संस्थांकडून आरतीची पुस्तके प्रकाशित करून मोफत वाटली जात असत.

काही व्यापार्‍यांनी, सेवाभावी संस्थांनी आरतीची पुस्तके प्रसिद्ध करून आणि त्यासाठी जाहिराती मिळवून बर्‍यापैकी नफाही कमावला होता. अनेकांना आर्थिक हातभार आणि भरपूर प्रसिद्धी मिळवून देणार्‍या या पुस्तकांचे भवितव्य मात्र आता अनिश्चित झाले आहे. इंटरनेटमुळे या पुस्तकांच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

आरतीची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे भक्तांच्या हातात पुस्तकांऐवजी मोबाईल दिसू लागले आहेत. एकाने गणपतीची आरती डाऊनलोड करायची आणि ती सर्वांना शेअर करायची. ही आरती मोबाईलमध्ये असल्यामुळे सोबत आरतीची पुस्तके बाळगण्याची गरज नाही.  त्यामुळे पुस्तके विकत घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आरती डिलीट करण्याची आणि पुढच्या वर्षी पुन्हा डाऊनलोड करण्याची सोय इंटरनेटमुळे उपलब्ध आहे. त्यामुळे पुस्तकांवर गदा आली आहे. यंदाच्या वर्षी आरतीची 10 टक्केही पुस्तके प्रकाशित झाली नाहीत. पुढच्या वर्षी ही संख्या आणखीनच कमी होऊन ही पुस्तके दिसणारही नाहीत,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पुस्तकांच्या दुकानातून आरती संग्रह विकत घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचे एक कारण ऑनलाईन आरत्या हे जरी असले तरी ते एकमेव कारण नाही. तसेच आज वृत्तपत्रातूनही आरती संग्रह फुकट मिळू लागले आहेत. त्यामुळे त्यांची दुकानातील विक्री कमी झाली हे निश्चित. – अशोक कोठावळे, मालक, मॅजेस्टिक प्रकाशन

इंटरनेटचा वापर कमी असताना, चार वर्षांपूर्वी गणपतीच्या आरती संग्रहाची चार-पाच हजार पुस्तके छपाईची ऑर्डर मिळत होती. गेल्यावर्षी ही संख्या पाचशेवर आली. यंदा तर एकही पुस्तक छपाईसाठी आले नाही. मोबाईलवर आरत्या मोफत उपलब्ध होऊ लागल्याने पुस्तकांच्या छपाईवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रिंटर,जाहिरात प्रतिनिधी आणि मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. – राजेश रोडे, मालक, डी माईंड प्रिंटर्स, वसई

ऑनलाईन पुस्तिकेचा छापील पुस्तकांवर कोणताही परिणाम होणार नाही. मोबाईलवर आरती पाहून बोलणे अवघड जाते.पुस्तकातून आरती बोलणे,आरत्या चाळणे सोपे जाते. दरसाल नवरोत्रोत्सवाला आम्ही आरत्यांची पुस्तके प्रसिद्ध करतो,यंदाही करणार आहोत. -प्रवीण म्हाप्रळकर, तालुका प्रमुख, शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -