घरमुंबईरेल्वेचे बोगस पास बनविणार्‍या आरोपीस अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

रेल्वेचे बोगस पास बनविणार्‍या आरोपीस अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Subscribe

रेल्वेने प्रवास करण्यासाठी आमिषाला बळी पडू नका

राज्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव होताच मागील १० महिन्यांपासून मुंबईतील सर्वसामान्यांना लोकलप्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर पत्रकार आणि इतर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु काहीजण बोगस पास बनवून लोकलने प्रवास करत आहेत. रेल्वेचे बोगस पास बनविणार्‍या शिव आझाद मिश्रा या ३५ वर्षांच्या आरोपीस सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात तीन मोबाईल, पाच डेल आणि इंटेल कंपनीचे संगणक, एक एचपी कंपनीचा प्रिंटर, एक कॅनॉन कंपनीचा कलर झेरॉक्स प्रिंटर, एक एचपी पवेलियन कंपनीचा लॅपटॉप आदींचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेसाठी रेल्वेसाठी विशेष पासची व्यवस्था केली आहे. सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाच सोशल मिडीयावर काहीजण अत्यावश्यक सेवेसंदर्भात रेल्वे पाससाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करीत होते. याबाबतची माहिती सायबर सेल पोलिसांना मिळाली होती, या माहितीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सायबर सेल पोलिसांना देण्यात आले होते, त्यानंतर या पथकाने चौकशी करुन कुर्ला रेल्वे स्थानकातून शिव आझाद मिश्रा या आरोपीस अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने अनेकांना बोगस रेल्वे पास बनवून दिले होते, तसेच त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले. संबंधित रेल्वे पास तो स्वत बनवित होता. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. रेल्वेने प्रवास करण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तसेच सोशल मिडीयावर प्रसारीत होणार्‍या अशा फसवणुकीच्या जाहिरातीबाबत पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -