घरताज्या घडामोडीरेणू शर्माने तक्रार घेतली मागे, धनंजय मुंडेंना दिलासा

रेणू शर्माने तक्रार घेतली मागे, धनंजय मुंडेंना दिलासा

Subscribe

मी एका राजकीय षडयंत्राचा बळी ठरत असल्याचे लक्षात येत असून मी हा निर्णय घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटले आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली. रेणू शर्मा नावाच्या महिलेने मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला. मात्र आता रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या सगळे आरोप मागे घेतले आहे. आपली भुमिका मांडण्यासाठी रेणू शर्मा यांनी ट्विटच्या माध्यमातून एक पत्र लिहून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मी एका राजकीय षडयंत्राचा बळी ठरत असल्याचे लक्षात येत असून मी हा निर्णय घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटले आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले बलात्काराचे आरोप मागे घेतले आहे असे सांगून एक पत्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘धनंजय मुंडे यांच्या विरोधात लग्नाचे आश्वासन देऊन बालात्काराचा आरोप केला होता त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे. धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीमध्ये काही तणाव होता. त्यांचे प्रकरण न्यायालयात गेल्याने मी मानसिक तणावात आणि दबावात आले होते. विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात जात असल्याने मी राजकारणातील मोठ्या षडयंत्राचा बळी ठरत असल्याचे लक्षात येत आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ‘कोही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. हे सगळे चुकीचे आहे. माझ्या घरातील लोकांची नावे मला खराब करायची नाहीत. मी शेवटी इतकेच सांगते की, मी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी मागे घेत आहे. मला त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार करायची नाही. बलात्काराची किंवा लग्नाचे आश्वासन देण्याची माझी कोणतीही तक्रार नाही. त्याचप्रमाणे माझा कोणताही अयोग्य फोटो किंवा व्हिडिओही नाही. हे सगळे मी पूर्ण शुद्धीत सांगत आहे,’असे रेणू शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक; कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका – अजित पवार

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -