घरमुंबईठाण्यात अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई

ठाण्यात अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई

Subscribe

दुसर्‍या दिवशी ३०६ फूटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त

ठाणे शहरात फूटपाथवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम आणि बॅनर्स पोस्टर विरोधात ठाणे महापालिकेने मंगळवारपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. बुधवारीही पालिकेने जवळपास ३६ फेरीवाले, १७३ हातगाड्या, ४१ टपर्‍या,२१ पोस्टर्स, १७ बॅनर्स आणि ३०६ फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारपर्यंत चालूच राहणार आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे फेरीवाले बॅनस पोस्टरवर कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागाने दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कामाला लागले आहेत. शहराच्या विविध परिसरात अतिक्रमण कारवाई जोरात सुरु आहे. बुधवारी दुसर्‍या दिवशीही पोलीस बंदोबस्तात जोरदार कारवाई सुरू होती. या कारवाई अंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील ४० हातगाड्या, ७ पोस्टर्स, दिवा प्रभाग समितीमध्ये ७ हातगाड्या, २० बॅनर्स, माजिवडा प्रभाग समितीमध्ये ५ फुटपाथवरील अतिक्रमणे, १२ फेरीवाले, ३५ हातगाड्या, २ पोस्टर्स, १ बॅनर्स, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये ७० फुटपाथवरील अतिक्रमणे, २६ फेरीवाले, नौपाडा प्रभाग समितीमध्ये ६० फुटपाथवरील अतिक्रमणे, १० हातगाड्या, ५ बॅनर्स, लोकमान्य सावरकर प्रभाग समितीमध्ये २० फुटपाथवरील अतिक्रमणे, ३१ हातगाड्या, ०५ पक्क्या टपर्‍या, ६ बॅनर्स, कळवा प्रभाग समिती २५ फुटपाथवरील अतिक्रमणे, १७ हातगाड्या, ८ पक्क्या टपर्‍या,१२ पोस्टर्स, दिवा प्रभाग समितीमध्ये ३८ फुटपाथवरील अतिक्रमणे, १८ हातगाड्या, ५ बॅनर्स, मुंब्रा प्रभाग समितीमधील ८ लाकडी बाकडे, ९ लोखंडी स्टॅन्ड, २ मच्छी टब, ३ शेगडी, २ सिलिंडर, १ चप्पल स्टॅन्ड, २२ ठेले, ५ वेदर शेड तर उथळसर प्रभाग समितीमध्ये ३८ फुटपाथवरील अतिक्रमणे, १७ हातगाड्या,२२ पक्क्या टपर्‍या जमिनदोस्त करण्यात आल्या. सर्व सहाय्यक आयुक्त यांनी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -