घरमुंबईएलईडी मासेमारी बोटी कारवाई पथकाचा जाळ्यात

एलईडी मासेमारी बोटी कारवाई पथकाचा जाळ्यात

Subscribe

लाखोंचे साहित्य जप्त

सरकारची बंदी असतानाही एलईडी मच्छीमारी करणार्‍या पाच बोटी मत्स्यव्यवसाय विभागाने पकडल्या आहेत. त्यातून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रत्नाकर राजम आणि उरणचे परवाना अधिकारी स्वप्निल दाभणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. एलईडी मासेमारी विरोधात मच्छीमार संघटनांनी नुकताच आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई लक्षणीय मानण्यात येत आहे.

बेसुमार आणि अनैसर्गिक मासेमारी, तसेच समुद्रात सतत येणारी चक्रीवादळे यामुळे महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण 22 टक्क्यांनी घटले आहे. मच्छीमारदेखील वेगवेगळे तंत्र आणि क्लुप्त्या वापरून जास्त मासळी पकडण्याचा अनैसर्गिक प्रयोग करताना दिसत आहेत. अंधारात एलईडीच्या प्रखर प्रकाशझोतात मासेमारी केली जाते. त्यामुळे समुद्रातील लहान आणि मोठी मासळी त्याकडे आकर्षित होऊन जाळ्यामध्ये अडकली जाते. परिणामी मासळीचा नैसर्गिक समतोल राखला जात नाही. त्यामुळे एलईडी मासेमारी करणार्‍या बोटींवर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने मच्छीमारांकडून करण्यात येत होती.

- Advertisement -

त्याच अनुषंगाने शासनानेदेखील एलईडी मासेमारीवर बंदी घातलेली आहे. मात्र तरीही अंधारात एलईडी दिव्यांच्या अधारे मच्छीमारी करणार्‍या पाच बोटींना कायद्याचा हिसका दाखवत मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचे पाऊल उचलेले आहे. एलईडी मासेमारीसाठी वापरण्यात येणारे जनरेटर, एलईडी दिवे, जाळी आदी लाखो रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच या बोटींचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती राजम यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -