घरमुंबईराज ठाकरेंनी केलं केतकी चितळेचं अभिनंदन!

राज ठाकरेंनी केलं केतकी चितळेचं अभिनंदन!

Subscribe

केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. ट्रोल करणाऱ्यांनी केतकी चितळेला अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये टीका आणि शिव्या दिल्या होत्या.

“सोशल मीडियावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन” अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासोबत केतकी चितळे यांनी राज ठाकरे यांची आज सकाळी कृष्णकुंजवर भेट घेतली. दरम्यान, “राज ठाकरे यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी मला बोलावलं होतं”, अशी प्रतिक्रिया केतकीने दिली.

काय आहे प्रकरण

केतकी चितळेवर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. ट्रोल करणाऱ्यांनी केतकी चितळेला अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये टीका आणि शिव्या दिल्या होत्या. हिंदी भाषेमध्ये केतकी बलल्यामुळे केतकीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. तिला ट्रोल करणाऱ्या आणि तिच्यावर टीका करणाऱ्यांना तिने पुन्हा एका व्हिडिओ पोस्टद्वारे अत्यंत रोखठोकपणे उत्तर दिले होते.

- Advertisement -

केतकीने दिलेले उत्तर कौतुकास्पद

“सोशल मीडियावरील महिलांशी मतभेद झाल्यावर काहीजण अत्यंत घाणेरड्या शब्दांत महिलांवर टीका करतात. दुर्दैवाने, आजही महिलांच्या मतांचा, तसंच त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात, विशेषतः सोशल मीडियात दिसत नाही. महिलांवर बीभत्स शब्दात टीका करणाऱ्यांना केतकीने जे रोखठोक उत्तर दिले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे” असं मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. दरम्यान, महिला अभिनेत्री आणि महिलांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – 

‘केतकीला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -